चंद्रपूर: आधीच अतिवृष्टीमुळे यंदा तीबार पेरणीच संकट बळीराजावर ओढवलं. मोठ आर्थिक नुकसान झालं असतानाही बळीराजा हिमतीन उभा राहिला. कापसाला सध्या बाजारभाव चांगला भाव आहे. मात्र, कापसाची वेचणी सुरू असतानाच काल रात्रीच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यालाअवकाळी पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले याला मंदोस असे नाव देण्यात आले. राज्यात या चक्री वादळाचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली, चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार असून राज्यातील 13 जिल्ह्याना अलर्ट देण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग 65 ते 85 किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.