अखेर रामाळा तलावातील दूषित पाणी सोडले
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल
चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात मागील काही दिवसापासून Contaminated water diseases दूषित पाण्यामुळे मृत मासोळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. या संदर्भात समाज माध्यमातदेखील व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेत दूषित पाणी सोडून तलाव कोरडे करण्याचे निर्देश दिलेत. आज १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेत रामाळा तलावाच्या स्वच्छता व सौंदयीकरण करण्यासाठी आढावा घेतला.
चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलाव मागील काही वर्षांपासून दूरावस्थेत सापडला होता. इको प्रो या सामाजिक संघटनेने आंदोलन केल्यानंतर या तलावाच्या सौंदर्यकरण आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात आला. राज्य शासनाने निधी दिल्यानंतर या तलावातील इकोर्निया वनस्पती काढण्यात आली. मागील वर्षी त्यासाठी खनिज विकास निधीअंतर्गत निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पावसाळ्यामध्ये हे काम थांबले. पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी तलावात तुडुंब भरले. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शहराच्या काही भागातील वस्त्यांमधून सांडपाणी येत असल्याने तलावातील पाणी दूषित होऊ लागले आहे. त्यामुळे येथे असलेल्या मासोळ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून तलावाच्या काठावर मृत मासोळ्यांचा ठीक साचून येत आहे. इतकेच नव्हे तर मृत मासोळ्यामुळे आणि तलावातील पाण्यातील दूषितपणामुळे दुर्गंधी सुटली. या भागात राहणाऱ्या नागरिकांना आणि व्यवसाय करणाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
Latest and Breaking News on ramala lake.
#चंद्रपूर च्या नागरिकांनी अशा दूषित पाण्यातील मासोळ्या खायच्या का? रामाळा तलावातील पाणी सोडून तलाव कोरडे करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतरही स्थिती जैसे थे आहे. @SMungantiwar@InfoChandrapur @ChandrapurC @collectorchanda@CMOMaharashtra pic.twitter.com/jF4FAzWJxA
— 𝐃𝐞𝐨𝐧𝐚𝐭𝐡 𝐆𝐚𝐧𝐝𝐚𝐭𝐞™ (@DevShilpa14) December 16, 2022
चंद्रपूर शहरातील नागरिकांना फिरायला येण्यासाठी एकमेव तलाव आहे. या तलावाच्या परिसरात रोज सायंकाळी आणि सकाळी देखील मोठ्या प्रमाणात तरुण आणि वृद्ध नागरिक येत असतात. मात्र, पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तलावातील पाणी सोडण्याची सूचना केली. शिवाय तलावातील सौंदयीकरण, खोलीकरण, स्वच्छतेसाठी बैठक घेण्याचे सूचित केले. त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला विशेषकार्य अधिकारी श्री. इंगोले, मनपाचे आयुक्त विपिन पालीवाल, मनपाचे माजी उपमहापौर राहुल पावडे, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, डॉ. गुळवणे यांची देखील उपस्थिती होती.
Latest and Breaking News on ramala lake.
नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने तलावातील पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात हे तलाव पूर्णता कोरडे होणार असून, त्यानंतर पुढील स्वच्छता आणि खोलीकरणाचे कामे केली जातील, असे या बैठकीत सांगण्यात आले.