Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

माता महाकाली मंदिराच्या परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करा - आ. किशोर जोरगेवार | Mahakali Temple | Chandrapur

चंद्रपूर,| आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. झाडीपट्टी नाट्यगृहासाठी निधी देण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.   Hiwali Adhiveshan  | Nagpur | Maharashtra  | Kishor Jorgewar | Mahakali Temple | Chandrapur   


  अधिवेशानाच्या तिस-या दिवशी नगर विकास विभागाच्या भाग क्रमांक १०९ पुर्व सुविधा अंतर्गत विषयावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यावेळी सभागृहात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हे माता महाकालीचे शहर म्हणून ओळखले जाते, विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन नगर विकास मंत्री असतांना आणि आताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असतांना त्यांनी माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी ५९ कोटी  रुपये मंदिराच्या बांधकामाला दिले. या कामाच्या निविदेला मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र आता टप्पा २ च्या कामासाठी ७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. येथील झरपट नदीच्या ठिकाणी असलेल्या घाटांची, मंदिर प्रवेशद्वार यासह मंदिर परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी या निधीची आवश्यकता असुन सदर निधी अर्थमंत्री यांनी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.           

  चंद्रपूर, गडचिरोली, भंडार आणि गोंदीया या चार जिल्हांमध्ये झाडीपट्टी रंगभूमी आहे. जवळपाच ५० ते ६० हजार कलावंत येथे आहे. मनोरंजनासह सामाजिक प्रबोधनाचे काम या झाडीपट्टी कलावंताच्या वतीने केल्या जात आहे. ग्रामीण भागामध्ये काही काळापुरते त्यांच्या नाटकाचे प्रयोग होतात. इतर वर्षभर मात्र त्यांना आपले नाटक सादर करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. चंद्रपूरात असलेल्या नाट्यगृहाचे भाडे या कलावतांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे या झाडीपट्टी कलावंतांना अद्यावत नाट्यगृह नगर विकास माध्यमातुन तयार करण्यात यावे अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.