Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

अखेर प्रवेश शुल्काचे बॅनर काढले; आम आदमी पार्टीचा हंगामा Aam Aadmi Party



नुकतेच दोन दिवसा अगोदर जिल्हा क्रीडा संकुलातील धावपट्टीचे इतर कामांचे लोकार्पनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला पण दोन दिवस होत नाही तर आपल्या विभागामार्फत जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश हवा असेल तर 500 रुपये द्यावे लागेल फुटबॉल खेळायचे असेल तर एक लाख रुपये असा तुघलकी फर्मान असलेला बोर्ड लावण्यात आलेला आहे .Finally removed the entrance fee banner; The season of Aam Aadmi Party

पण प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्हा हा मानव विकास निर्देशकांच्या बाबतीत पिछाडीवर असून जिल्ह्यातील अनेक तालुके आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्याच्या मागासलेल्या तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये दररोज सरावासाठी येतात तसेच तापमान वाढ व प्रदूषणामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक सुद्धा आरोग्य जपण्यासाठी येतात मात्र खेळाडू व सामान्य नागरिकांकरिता मोठे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असे फलक लावल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच खेळाडू मध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे तरी हे लावण्यात आलेले प्रवेश शुल्काचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ईशारा युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यानी देत तात्काळ क्रीडा संकुलात लावण्यात आलेले प्रवेश शुल्काचे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे बॅनर काढण्यास भाग पाडले.

या आंदोलनात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे शहर सचिव राजू कूड़े जिल्हा सचिब संतोष दोरखंडे महानगरअध्यक्ष संतोष बोपचे, सिकंदर सागोरे,सुनिल सादभया,योगेश गोखरे,सुधिर पाटिल,स्वप्निल घगरगुंडे,दिपक बेरशेट्टीवार,जितेन्द्र भाटिया,कृष्णा साहारे,गणेश बंसोड़,सुजित चेटगुलवार,मधुकर साखरकार,अशोक महूरकर तसेच अनेक विद्यर्थि उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.