Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

धारिवालला 62 लाखांची भरपाई देण्याचे निर्देश Dhariwal power plant Chandrapur

 Chandrapur Powerplant Special Report : 

धारिवालला 62 लाखांची भरपाई देण्याचे निर्देश  Dhariwal power plant Chandrapur

खासदार बाळू धानोरकर यांच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळणार न्याय

Dhariwal power plant Chandrapur

 धारिवाल इंफ्रास्ट्रक्चर लिमी ताडाळी बाबत प्रदूषण व रोजगार संबंधाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत तहसिलदार, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची समिती नेमून खासदार बाळू धानोरकर यांचे दि. ६ डिसेंबर २०२२ चे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने या चार अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष मौका पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे.

चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Dhariwal Infrastructure limited (DIL) - Chandrapur) तळाली एमआयडीसी यांच्या प्रदूषण, पर्यावरण आणि रोजगाराच्या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी मुद्दा उचलल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी धारिवाला कंपनीला 21 डिसेंबर रोजी ६२ लाखांची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच धारिवाल प्रशासनाकडून फी भरण्यात न आल्याने मोजणी प्रलंबित असून, मोजणीची फी तात्काळ भरण्यासाठी प्रशासनाने कळविले आहे. खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी रोखठोक भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासनाने ही कारवाई तातडीने केली आहे. 


चंद्रपूर तालुक्यातील वढा परिसरात असलेल्या धारिवाल कंपनीने नदीपात्रात पंप हाऊस टाकला होता. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना प्रदूषण समस्या सहन करावी लागत होती. त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी खासदार बाळू धानोरकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. त्यानुसार 14 डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याचे सुचित करून 21 तारखेपर्यंत मोबदलाही देण्याची कारवाई करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई केलेली आहे. 

चार अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष मौका पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे.

      या अहवालात धारिवाल कंपनी कडून अवैधरित्या नदी पात्रामध्ये चार मोठे पंप बसवून पाण्याची अवैधरीत्या उचल होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्याने निदर्शनास आणले. पाटबंधारे विभागाने अद्यापही सूचना केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. 

धारिवाल कंपनीकडून निर्माण करण्यात आलेल्या पाण्याची टाकी आणि जलाशय परिसरातुन पाझर निर्माण होऊन अवतीभवतीच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेले. त्यामुळे शेत जमिनीचे नुकसान झाले. घटनास्थळी पाहणी केली असता तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या अहवालामध्ये 13 आणि 14 डिसेंबर रोजी जवळपास 28 शेतकऱ्यांच्या शेतजमीतील नुकसानीची पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची आणि शेत जमिनीचे नुकसानीचा अहवाल तालुका कृषी अधिकारी यांना सादर करण्यात आला. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून २० डिसेंबर 2022 रोजी प्राप्त अहवालाचे अनुषंगाने 28 शेतकऱ्यांना त्यांच्या शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत आणि जमीन पडीक राहिल्यामुळे सन 2015 ते 16 पासून आतापर्यंत जवळपास 62 लाख 36 हजार 911 रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ही रक्कम जमा करण्यासाठी आज 21 डिसेंबर रोजी धारीवाल कंपनीला सूचित करण्यात आले. 


या धारिवाल कंपनीने वढा नदीच्या पात्रामध्ये पाईपलाईन टाकली होती. १६ किलोमीटरची पाईपलाईन टाकताना शेतकऱ्यांच्या शेतातून जात आहे किंवा नाही याची तपासणी करून धारिवाल कंपनीने स्वतःच्या पैशातून मोजणी करावी अशी मागणी खासदार यांनी केली होती. त्यानुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर तसेच धारीवाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा पाईपलाईन ज्या ज्या गावाच्या शिवधुऱ्यातून गेलेली आहे. त्या गावचे सर्व संबंधित तलाठी यांची बैठक घेतली. शिवधुराच्या मोजणीबाबत अर्ज सादर करण्यासाठी निर्देश करण्यात आले होते. तलाठी आणि मोजणीसाठी आवश्यक सर्व सातबारा कंपनी प्रशासनास उपलब्ध करून देण्याबाबत आदेशित केले. तसेच उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणी अर्ज प्राप्त हो ताच मोजणी करण्यासाठी सूचित केले.  त्यानुसार उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणीसाठी आवश्यक असणारी फी 9 लाख 36 हरांची भरणा करण्याची सूचना धारिवालला केली होती. मात्र धारिवाल कंपनीने अद्यापही मोजणीची फी भरलेली नाही. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे. सदर मोजणीची फी तात्काळ भरण्याची सूचना देखील जिल्हा प्रशासनाने धारीवाला दिले आहेत. 


धारिवाल कंपनीचे वाहन हे मुख्य रस्त्यावर राहत असल्याने अपघाताच्या देखील घटना घडत असतात. या संदर्भात देखील खासदार धानोरकर यांनी लक्ष वेधले होते. धारिवाल कंपनीचे हे मुख्य रस्त्यावर पार्किंग असलेल्या वीस वाहनांवर तसेच ताळपत्री नसलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  तसेच धोकादायक दिशेने चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या एका वाहनावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली . 

संबंधित शोधधारिवाल पॉवर स्टेशन किंवा सीईएससी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाली शहराजवळ स्थित कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. सीईएससी लिमिटेडची उपकंपनी धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे पॉवर प्लांट चालवला जातो. 
लोक हेदेखील ‍व‍िचारतात

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.