*नागपूर विधानसभेवर भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा
नागपूर - भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा (दि. २०) डिसेंबर रोजी मंगळवार, सकाळी १० वा. धंतोली यशवंत स्टेडियम, दुर्गा मंदीर नागपूर येथून निघून यशवंत स्टेडियम, महाराष्ट्र बैंक, आनंद टॉकीज, लोहापुल मार्गे (बर्डी) टेकडी येथे दाखल होणार आहे.
मोर्चाचे नेतृत्व व संयोजक शाहीर राजेंद्र मिमराव बावनकुळे, ज्ञानेश्वर वांढरे, गणेश देशमुख, वसंता कुंभरे, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, नरहरी वासनीक, दिपमाला मालेकर वर्धा करतील कलाकार शाहीरांच्या मोर्चात कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता सर्व कलाकार शाहीरांनी एकत्र येऊन विधान सभेवर मोर्चा नेण्याचा निर्धार केला. यांत कलंगी, तुर्रा, सुभान खेमभारती, निळा निशान, लाल निशान, पिवळा निशान खड़ी गम्मत, पोवाडा, तमाशा, खडीदंडार, डाहका, भारुड, भजन, वराडी गीत, तुमडी, गोंधळ, दहा अंकी नाटक, दसनामी, तीन ताल, तेरा ताल, बंजारा, गोंडीगीत, ठुमरी, लोककला, नाटक, लोक नृत्य, लेखक, कवि, शायर, किर्तनकार, आदी कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती संयोजकांनी केले आहे.
Indira Gandhi Pradhan Mantri Awas Yojana, Khadi Gammat Package | Khadi Dandar, Khadi Dahaka, Sangit Drama
या विधानसभेत भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषद नागपूर च्या वतीने कलावंत व शाहीर यांचे हितासाठी मागण्या केल्या आहेत यात वृध्द्ध कलावंताच्या मानधन रकमेत वाढ करून आठ हजार ते नऊ, दहा हजार रुपये इतके असावे. अ, ब, क दर्जानुसार असावे त्याची मुदत किमान 3 वर्षाची असावी व नंतर रक्कमेत वाढ व्हावी., जिल्हा समितीमध्ये फक्त वार्षिक 100 मानधन प्रकरणे मंजूरीस असतात, ती प्रकरणे ची संख्या तीनसे मंजुर करावीत. मागिल शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत., वृध्द कलावंत वयोमर्यादा वय 50 वर्ष आहे. ती वय 40 वर्ष करावी कारण आयुष्यभर प्रवास अनियमीतता अशा कारणाने वृध्दत्व लवकर येते., इनकम सर्टीफीकेट (उत्पन्न ) अटेचाळीस हजार रुपये वरुन दोन लाख रुपये करण्यात यावी., कोरोना काळात कलावंतांना जाहीर केलेले पॅकेज त्वरीत देण्यत यावे., वृध्द कलावंतास शासनाकडून सर्व आरोग्य सेवा मोफत मिळण्यात यावी. याबाबत आधार कार्ड प्रमाणे वेगळे शासनमान्य ओळखपत्र शिखर संस्था सभासद कलावंतास द्यावे., वृध्द कलावंत मानधन योजनेतील मानधन रक्कम कलावंताच्या बँक खात्यात जमा व्हावी. त्यात दर महिन्यात अथवा तिमाहीत पणा असावा., लोक कलावंत, शाहीर हे तालुका पातळीवर राहतात, त्यांचे रहाते गावी घर बांधण्यास बँकतर्फे संपुर्ण बिनव्याजी
शासन शिफारसीने कर्ज मिळावे. त्याचे हक्काचे घर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, बँक हप्ते सोयीस्कर असावेत.,वृध्द कलावंतांच्या मुला मुलीचा शिक्षणाचा खर्च शासनानेच करावा. ते संपुर्ण शिक्षण घेऊ शकतील.,सांस्कृतिक कार्य विभागाप्रमाणेच कलावंत व वृद्ध कलावंत सहाय्य विभाग असा स्वतंत्र शासनाचा विभाग असावा.
सदर विभाग सांस्कृतिक आणि सामाजिक न्याय या दोन्ही विभागांशी संलग्न असावा., सर्व कलावंतास एसटी प्रवास व रेल्वे प्रवास संपुर्ण मोफत म्हणजे विनाशुल्क असावा. तसेच आमदार, पत्रकार या प्रमाणे कलाकार आसन नामांकन राखीव असावे. जो त्याच्या सेवेचा गौरव आहे.,कलावंतांना प्रवास करतांना सोबत एक व्यक्ती विनाशुल्क अशी व्यवस्था असावी. (समाजभुषण प्रमाणे) , कलावंत सहाय्य विभागाचे कलावंत संख्या जास्त असलेल्या जिल्हात एक कार्यालय असावे., शेतकरी मित्र अपघात विमाप्रमाणे, कलाकारास अपघात विमा मिळावा., प्रत्येक जिल्हात सांस्कृतिक भवन बांधुन द्यावे., वृद्ध कलाकारांची इच्छा असल्यास आणि तो शारीरिक, मानसीक दृष्ट्या योग्य असल्यास तालुका, जिल्हा, शहर पातळीवर विविध समित्यांमध्ये त्यास कार्यरत ठेवावेत. जेणेकरून त्याला मिळणारया शासन योजनेचा फायदयाचा शासनाला बोजा होणार नाही., वृध्द कलावंताच्या मृत्युनंतर त्याचे पत्नीस योग्य ती कागदपत्रे (पुरावे) सादर झाल्यानंतर त्वरीत मानधन सुरू व्हावे., ज्या कलावंताना शासनाचे मानधान मिळते अश्या कलावंताना ओळख पत्रदेण्यात यावे. जिल्हापरिषद, समाज कल्याण विभाग मार्फत देण्यात यावे., शासनमान्य वृध्द कलाकारांना घरकुल योजने अंतर्गत घरकुल देण्यात यावे. उदा. इंदिरा गांधी, प्रधानमंत्री आवास योजना , खड़ी गम्मत पॅकेज प्रमाणे खडी दंडार, खडी डहाका, संगित नाटक पॅकेज जाहिर करण्यात यावेत. Indira Gandhi Pradhan Mantri Awas Yojana, Khadi Gammat Package | Khadi Dandar, Khadi Dahaka, Sangit Drama
त्याचप्रमाणे केंद्र सरकार कडून मागण्या पुर्ण करण्यात यावेत यात केंद्राची कलाकार पेंशन वय 60 वर्ष आहे. ती 40 वर्ष करण्यात यावी., केंद्र शासनाचे कलाकार पेंशन चार हजार रु. महिना आहे ते बारा हजार रू .करण्यात यावी., केंद्र शासनाचे कलाकार पेंशन दरमाह बँकेमार्फत खात्यामध्ये नियमीतपणे जमा करण्यात यावी., महाराष्ट्रात समाज कल्याण, जिल्हा परिषद मार्फत वृध्द कलावंत मानधन समिती आहे त्याच प्रमाणे केंद्र सरकारने सुध्दा वृध्द कलावंत मानधन समिती बनविण्यात यावी. यावेळी सहयोगी सर्व श्री शाहीर, कलाकार श्रीराम मेश्राम तीतुरवाले, प्रकाश ढवळे पुणे, माणिकराव देशमुख, अंबादास नागदेवे भंडारा,बहादुला बराडे शंकरराव येवले, आनंदराव ठवरे,मधुकर बान्ते गोंदिया, सुबोध कान्हेकर सर, गरिबा काळे, मोरेश्वरजी मेश्राम, दयाल कांबळे, ब्रम्हा नवघरे, राजकुमार गायकवाड, पुरुषोत्तम खांडेकर डॉ. भास्करराव विघे, केशव नारनवरे, उर्मिला चौधरी, सुरमा बारसागडे, राजेंद्र येसकर, तनबा शिंगरे, डॉ समर मोटघरे, विकास शेंडे,यादवराव कांहोलकर,इंजी चेतन बेले आदी शाहीर कलाकारांनी मोर्चा मध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय अध्यक्ष शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी केले आहे.