Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२

माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांना महत्वाची विनंती |

गोमाता वन उद्यानाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्या 

माजी खासदार नरेश पुगलिया यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांना निवेदन 

जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार माननीय श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान दोन नेत्यांमधील जिल्ह्यातील विकासाचा दृष्टिकोनातून ज्वलंत समस्यावर चर्चा झाली या चर्चा मध्ये काँग्रेसचे युवा नेते राहुलबाबू पुगलिया उपस्थित होते.


Former MP Naresh Puglia and Forest Minister Sudhir Mungantiwar

महाराष्ट्रामध्ये १० वर्षावरील गौरंक्षण ज्या संस्था आहेत आणि ज्यांच्या गौरक्षण संस्थेमध्ये शेकडो गाई आहेत, अशा गौरक्षण संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने ज्या गौरंक्षण संस्थामध्ये १०० गाई आहेत, त्यांना १० एकर वन जमीन, ५०० गाई असेल तर ५० एकर वन जमीन व १००० गाई असेल तर १०० एकर वन जमीन या प्रमाणात गौ-पालनासाठी वनविभागाने द्याव्यात आणि गोमाता वन उद्यानाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्या, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्याकडे केली आहे. 


चंद्रपूर जिल्हयातील राजूरा येथील ३० एकर जागेवर वन उद्यान निर्माण केले असून, या संकलपनेतून जमीनीची मालकी वन खात्याचीच आहे. परंतु आमदार किंवा खासदार फंडातून, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व शासनाच्या इतर योजनातून राजूरा येथील हे वन उद्यान मोठ्या डौलाने उभे झाले आहे. सन २००२ पासून राजूरा शहरातील जनतेसाठी उपलब्ध असून, शहरातील ज्येष्ठ नागरीक व इतरांना मार्निंग वॉक व इव्हिनिंग वॉक करिता उपलब्ध  आहे. त्यामध्ये खेळांचे साहित्य, वाकिंग ट्रॅक, स्ट्रीट लाईट व प्रसाधन गृह उपलब्ध आहेत आणि दरवर्षी वृक्षरोपणाच्या माध्यमातून इतर जातीची झाडे, फुलांची व फळांची झाडे लावण्यात येत असून त्यांचे संवर्धनही करण्यात येत आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.