Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२

आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली! Tukaram Mundhe IAS




🎴शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होण्याची शक्यता!


भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागातील ही बदली झाल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहे. Tukaram Mundhe is a Maharashtra-cadre IAS officer 

मागील काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागात बदली झाली. पदाची सूत्रे घेतल्यापासूनच त्यांनी आजारी असलेल्या आरोग्य यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी विडा उचलला. आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालय न राहणाऱ्यांची वेतन कपात आदी कारवाया करून विशिष्ट कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम सुरू केले. मात्र या शिस्त घालण्याच्या प्रयत्नाला आरोग्य कर्मचारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत विरोध दर्शविला. 

प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासाठी बदली नवी नाही. मागील 16 वर्षात साधारणता 20 वेळा बदल झाल्या असतील. आरोग्य विभागात येऊन दोन महिने होत नाही, तोच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या संदर्भातील एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहे. मात्र ते खरे आहे की खोटे याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
Health Mission Commissioner Tukaram Munde transferred again!


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.