Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १५, २०२०

वडेट्टीवार कन्येकडून दीड हजार अन्नधान्याच्या किटचे वाटप

नागभीड़ तालुक्यात शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून वाटप
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोरोना विषाणू संसर्गाची लढतांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यांनादेखील अन्नधान्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आज नागभीड़ तालुक्यातील अनेक गावांमध्ये दीड हजार किटचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या महासचिव शिवानी विजय वडेट्टीवार यांनी या मोहिमेत पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनात सहभाग घेतला आहे. आज त्यांच्याहस्ते या भागात ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा व्यक्तींना पुढील दहा ते पंधरा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.यापूर्वीही त्यांनी चिमूर तालुक्यामध्ये दीड हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे.

 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच लक्ष कार्डधारकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. विविध सामाजिक दायित्व निधीमधून हे वाटप केले जाणार आहे. अंत्योदय व प्राधान्य क्रम योजनेतून जिल्ह्यातील अडीच लाख कार्डधारक नागरिकांना 2 व 3 रुपये दराने अन्नधान्य दिल्या जाते.

 तसेच प्रत्येक मानसी पाच किलो तांदूळ मोफत दिल्या जातो. मात्र यामध्ये या परिस्थितीत आवश्यक किराणा सामानाची देखील कुटुंबाला गरज आहे. त्यासाठी त्यांनी तेल, तिखट, मीठ, दोन डाळी व अन्य साहित्याच्या जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्याची मोहीम सुरू केली आहे.

नागभीड तालुक्यातील नागभीड, तळोधी बा. , वलनी, नांदेड, गिरगाव, कन्हाळगाव, सावरगाव, मोहाडी, कांपा या गावी शिवानीताई वडेट्टीवार यांचा दौरा कार्यक्रम गरीबाना किट वाटप गावाला भेट देवून महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस कमेटीचे महासचिव शिवानी विजय वड़ेट्टीवार यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. यावेळी नागभीड़ तालुक्याकरीता 1500 किटचे वाटप करण्यात येणार आहे .

यावेळी प्रफुल खापर्डे तालुकाध्यक्ष नागभीड़ काँग्रेस कमेटी, दिनेश गावंडे नगरसेवक, रमेश ठाकरे, प्रतीक भसीन, पंकज काळबांडे, खोजराज मरस्कोल्हे जी. प. सदस्य, विनोद बोरकर, संजय अगळे, विलास लांजेवार, तहसीलदार चव्हाण, मंडळ अधिकारी वक्ते मॅडम उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.