गुजगव्हाण येथील विपश्यना केंद्रात पुण्य महोत्सव
चिमूर तालुक्यातील गुजगव्हाण येथे असलेल्या लैदी सायडो विपश्यना केंद्रात पुण्य महोत्सव मध्यम कठीण चिवरदान 2022 कृतज्ञता समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला मनीषा पठाडे, खानगावच्या सरपंच अर्चनाताई रामटेके, सामाजिक कार्यकर्ते शंकर भरडे, पंचायत समिती सभापती राजूभाऊ गायकवाड, राजरत्न पठाडे, विजय देठे, विनोद देठे, नथुजी गारघाटे यांची उपस्थिती होती.
शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिल ग्रहण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर भिक्षू संघाचे आगमन, भिक्षू देसना, महापरित्रानपाठ कार्यक्रम पार पडले. रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता मेत्ता भावना, आठ ते दहा वाजेपर्यंत ध्यान साधना आणि त्यानंतर कृतज्ञता समारोह पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार प्रतिभाताई धानोळकर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय भिक्षू संघाचे प्रवचन, मध्यम कठीण जीवरदान आणि समारोपीय समारंभ कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला उपासक आणि उपासीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.