दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. आज सोमवारी सायंकाळी चंद्रपूर शहरात मोठ्या थाटात पूजन झाले. त्यांनतर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी झाली.
दिवाळीची तयारी अनेक दिवस आधीच सुरू केली जाते. यावरूनच या सणाचे महत्त्व लक्षात येते. घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी करून लक्ष्मीच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाते. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करणे विशेष फलदायी मानले जाते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवन सुख आणि संपत्तीने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर त्यांची कृपा प्राप्त होते. यंदाची दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होत आहे. आज शहरात नवउत्साह आणि उमेदीच्या संवाद होत आहे. काळोखाला छेद देणारी दिव्याच्या प्रकाशाची शक्ती आयुष्यात अशाच प्रकारे पुढे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या सणानिमित्त नवचैत्यन्न दिसून येत आहे.