गोंडकालीन वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेल्या चांदा अर्थात चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या महानगरपालिकेचा 25 ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन. महानगरपालिका स्थापन होऊन आज 11 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 ऑक्टोबर 2011 मध्ये नगरपालिका बरखास्त करून महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. 2012 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आणि चंद्रपूर शहराच्या पहिल्या महापौर म्हणून संगीता अमृतकर यांची नियुक्ती झाली. त्यानंतर अडीच वर्षांनी राजकीय सत्तांतरण झाले आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या राखी कंचरलावार या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दुसऱ्या महापौर बनल्या. 2012 ते 2017 हा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्यानंतर पुढील अडीच वर्षांनी पुन्हा निवडणूक झाली. त्यात भारतीय जनता पार्टीला बहुमत प्राप्त झाले आणि पक्षाने महापौर पदावर अंजली घोटेकर यांची नियुक्ती केली.
त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा राखी कंचरलावार महापौर पदाची संधी मिळाली.
महानगरपालिकेच्या निर्मितीपासून या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण तीन महिला महापौर शहराला लाभल्या.
महापालिकेची निर्मिती झाली. तेव्हा प्रशासकीय कार्यभार हा सात मजली इमारतीतून बघितला जायचा. पुढे अडीच वर्षांनी नगर परिषदेच्या जुन्या जागेवर भव्य इमारत उभी राहिली आणि मागील साडेसात वर्षांपासून मुख्य प्रशासकीय कार्यालयातून कारभार बघितला जात आहे.
या भव्य इमारतीमध्ये तळघरात वाहन पार्किंग, पहिल्या तळावर महापौर व पदाधिकाऱ्यांचे कक्ष, त्यावरील मजल्यावर आयुक्त आणि अधिकाऱ्यांची कक्ष, तिसऱ्या मजल्यावर राणी हिराई सभागृह आणि स्थायी समिती कक्ष, आणि चौथ्या माळ्यावर इतर शासकीय कक्षांची निर्मिती केलेली आहे. चौथ्या माळ्यावरुन देशाचा राष्ट्रध्वज डौलाने फडकत असतो. चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या महानगरपालिकेला 11 वर्षे उलटलीत. मात्र, नागरिक आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
Foundation day of Chandrapur Municipal Corporation today
Watch video on YouTube here: https://youtu.be/ovzyQx4em5c