आभाळा एवढं संकट कोसळूनही जिद्दीनं पुढं जाणारी आणि समाजाला आदर्श असणारी सुनिता पवार हीची ओळख खऱ्या अर्थाने निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी लोकांपर्यंत पोचवली. टिळेकर यांनी हवाहवाई चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह सुनिताची तिच्या घरी सदिच्छा भेट घेतली. सुनीताने बनवलेला मसाले भात खाऊन महेश टिळेकर,वर्षा उसगावकर यांनी सुगरण सुनिता चे कौतुक करून तिला हवाहवाई सिनेमाच्या विशेष शो साठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. याआधी पण महेश टिळेकर यांनी एस. स्टी.स्टँड वर आपल्या सुरेल आवाजात गाणी गाऊन पोट भरणारी गायिका मंगला जावळे ,आदिवासी गायक बाल्या यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली होती.
जगण्याची उमेद वाढवणारी सुनिता पवार
#maheshtilekar #varshausgaonkar #hawahawai #7october2022 #hawahawaimarathifilm















