जिल्हा रूग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या
आम आदमी पार्टीने घेतली तात्काळ दखल
Breaking news in Chandrapur today
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातशे हॉस्पिटल उघडणार अशी घोषणा केली, त्याच वेळी चंद्रपुरात उपचार न मिळाल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ नावाचेच उरले असून, कुठल्याच औषधी उपलब्ध नाही. सर्व औषधी बाहेरून आणावी लागते. जिल्हा रूग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आम आदमी पार्टीने (Aam Admi Party Chandrapur District - )केली आहे.
विजयादशमी दिवशी ५ ऑक्टोबर रोजी बाबुपेठ प्रभाग चंद्रपूर मधील डॉ. आंबेडकर नगर प्रभागातील टॉवर टेकडी येथील रहिवासी 21 वर्षीय तरुण शिवशंकर बेताल या युवकाची जिल्हा शासकीय रुग्णालयात किरकोळ आजाराने उपचारअभावी मृत्यु झाला. त्यांचा कपड्यावर रक्ताचे डाग पडले आहेत. नातेवाईकांनी घातपाताची शंका असल्याने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आपचे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांचेकडे फोन द्वारे केली.
आपचे पदाधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहचून संबधीत डॉक्टरशी विचारणा केली. त्यांनी रक्ताचे डाग हे सलाईंनमुळे पडल्याचे सांगितले आणि पेशंटला पोटाचा त्रास असल्याने अतिवेदनेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वेदना नेमक्या कशामुळे झाल्या ते शवविच्छेदन रिपोर्ट नी लवकरच कळेल, अशी माहिती दिली. जर पेशंटला पोटाचा त्रास होता तर आपण दोन दिवस काय केले? त्याची सोनोग्राफी का केली नाही, असा प्रश्न आपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला. तेव्हा मशीन खराब असल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले. जर मशीन असती तर त्या गरीब युवकाचे जीव वाचले असते. ही घटना चंद्रपूर सारख्या शहरातीळ व्यवस्थेला लाजवणारी आहे. जिल्हा रूग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, झोन 3 संयोजक रहेमान खान पठाण, प्रभाग संयोजक अनुप तेलतुंबडे, कृष्णा जी सहारे, आणि मृतकाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.