Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर २१, २०२२

A Tiger Died | रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू


Chandrapur: A tiger died on Friday after being hit by a train in Rajura forest area in Chandrapur district of Maharashtra. A senior official of the forest department gave this information. He said that the information about the death of the tiger was received in the morning when the gangmen of the railways saw the remains of the tiger on the Hyderabad-Balharshah railway route. Suresh Yelkarwad, Range Forest Officer of Rajura Forest Area said that the matter was informed to the Forest Department after which the team reached the spot.

चंद्रपूर । दोन दिवसात वेगवेगळ्या घटनेत दोन वाघांचा मृत्यू झाला.पोंभुर्णा येथे वाघ मृतावस्थेत आढळला होता.या घटनेला काही तास झाले असतानाच राजुरा तालुक्यात रेल्वेचा धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनांनी वनविभागात खळबळ उडाली आहे.

बल्हारशाह ते काझीपेट जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर चनाखा गावाजवळील कक्ष क्रमांक 158 मध्ये रेल्वेच्या धडक बसल्याने वाघ ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे

राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चूनाला नियतवनक्षेत्र मधून गेलेल्या रेल्वे रुळाची रेल्वे गँगमन नेहमी प्रमाणे सकाळी गस्त करीत असताना त्याला वाघ मृतावस्थेत दिसून आला.घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.वनविभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रेल्वेच्या धडकेत वाघ व इतर वन्यप्राणी नेहमीच मृत्युमुखी पडत आहेत. अश्या घटना परत घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत वन्यजीव प्रेमीनी व्यक्त केली आहे.



बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र.439 मध्ये गस्ती दरम्यान वाघाचा मृतदेह आढळून आला. एकच खडबड उडाली.मृत वाघ अंदाजे तीन वर्षाचा आहे .वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षित आहेत .

शवविच्छेदनानंतर वाघाच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले . सदर नमुने परिक्षणाकरीता रासायनिक विश्लेषक , जिल्हा न्यायसहाय्यक , वैद्यकिय प्रयोगशाळा नागपुर येथे पाठविण्यात येणार आहे . शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे कारण सांगता येईल,असे वनविभागाने म्हटले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.