Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर ०४, २०२२

३० लाखाच्या खंडणीसाठी मुख्याध्यापकाच्या मैत्रिणींकडूनच मुख्याध्यापकाचं अपहरण

नागपुर:
नागपुरात ३० लाखाच्या खंडणीसाठी मुख्याध्यापकाच्या मैत्रिणींकडूनच मुख्याध्यापकाचं अपहरण करण्यात आलं. प्रदीप मोतीरामानी वय 46, रा. क्रिष्णाती चौक, जरीपटका असं मुख्याध्यापकाचं नाव असून ते नागपूरातील महात्मा गांधी शाळेचे (Mahatma Gandhi Primary School) मुख्याध्यापक असून शुक्रवार संध्याकाळी ते काही कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. शुक्रवारी रात्री जेव्हा त्यांच्या मुलीने वडिलांच्या फोनवर संपर्क साधले. तेव्हा अपहरणकर्त्यानी प्रदीप यांच्या सुटकेसाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मोतीरामानी कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. शुक्रवार रात्रीपासून पोलीस पथक प्रदीप यांचे शोध घेत असताना काल संध्याकाळी ते सुखरूप परतले.

या प्रकरणी पोलिसांनी रीना फ्रान्सिस (वय 44, रा. महाराणा अपार्टमेंट, मानकापूर, सूरज फलके (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील विक्की जैस हा आरोपी अद्यापही फरार आहे. याच शाळेत रीना फ्रान्सिस ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान, रीना आणि प्रदीप यांच्यात 'खास' मैत्री झाली होती. त्यानंतर रीनाने तेथून नोकरी सोडून हिंगण्याच्या एका शाळेत नोकरी सुरु केली.
रीना आणि तिचा पती नोएल यांना एक मुलगी आहे. परंतु आपसात पटत नसल्याने त्यांनी 2009 मध्ये घटस्फोट घेतला. दुसऱ्या शाळेत शिकविणे सुरु केले तरीही रीना आणि प्रदीपचे मैत्री कायम होती. अशातच आर्थिक तंगीतून रीना आणि तिच्या घटस्फोट झालेल्या पतीने प्रदीपच्या अपहरणाचा बेत आखून शुक्रवारी रात्री 10.30 वाजता त्याचे अपहरण केले. परंतु पोलिसांनी माहिती मिळाल्याचे पाहून आरोपींनी शनिवारी दुपारी 3वाजता प्रदीपला सोडून दिले. प्रदीपचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ज्योती प्रदीप मोतीरामानी (वय 46) यांनी जरीपटका ठाण्यात दिली. तसेच 30 लाखांची मागणी आरोपींनी केल्याचे पोलिसांना सांगितल्याने पोलिसात खळबळ उडाली. पोलिसांनी तपासचक्र फिरवून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.
मौदा येथे जाऊन प्रदीपच्या मोबाईलवरुन 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याने घाबरुन आरोपींनी मुख्याध्यापकाला सोडून दिले. प्रदीपच्या कुटुंबियांकडून 15 लाख रुपये मिळतील अशी आरोपींना अपेक्षा होती. दरम्यान, आरोपी नोएल फ्रांसिसकडे बंदूक आणि चार राउंड सापडल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.