घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर चंद्रपूर शहरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव आणि मिरवणुकीवर बंधन आली होती. त्याचा सर्व बॅकलॉग यंदाच्या मिरवणुकीत भरून निघताना दिसटाय. चंद्रपूर येथील jatpura गेट परिसर असो किंवा मग गांधी चौकातील पठाणपुरा रोड परिसर ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
Read News | चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन, चौकशीचे आदेश
चंद्रपूरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपुरा गेट येथील गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत चंद्रपूरच्या राजाची मिरवणूक निघाली आहे. गांधी चौक ते जटपुरा गेट मिरवणुकीला सुरुवात झाली असून, गणपतींचं दर्शन घेण्यासाठी अधिकारी आणि राजकीय नेते दाखल झाले आहेत.
Read News | चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन, चौकशीचे आदेश
चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ टी-शर्ट ठरतेय लक्षवेधी
राज्यातील सत्तांतरानंतर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा राजकीय वर्तुळासोबतच समाजात व समाज माध्यमांत चर्चेत आहे. आता तर सार्वजनिक उत्सवातदेखील या घोषणेचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘पन्नास खोके, एकदम ओके’, असे लिहिलेल्या टी-शर्ट आल्या आहेत. या ‘टी-शर्ट’ राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.