*वेदांत, फॉक्सकॉन ग्रुप मुळे महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार हरविला*
*महिला शहर काँग्रेस अध्यक्ष तथा माजी महापौर संगीता अमृतकर यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेसतर्फे आंदोलन*
चंद्रपूर : वेदांत फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटी चा प्रकल्प महाराष्ट्र मध्ये तळेगाव दाभाडे येथे येणार होता . तशी ९०% बोलणी आणि तयारी ही झाली होती .परंतु ED (एकनाथ देवेंद्र) ह्या सरकारच्या अकार्यक्षमते मुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता गुजरातला पळविण्यात आला. ह्या मुळे महाराष्ट्रातील 1 लाख 25000 हजार तरुणांचा रोजगार नष्ट झाला आहे ,हे अतिशय निंदनीय आहे. आधीच कोरोना ने बेरोजगारी वाढली आहे. कमरतोड महागाई झाली आहे. उत्पन्नाची साधने कमी झाली आहेत, अश्यात कुठे रोजगार उत्पन्न होणार ही आशा पालकांना मध्ये आणि तरुणाई मध्ये पालवली असताना, ह्या निक्कम्म्या ED सरकारनी ,आमच्या महाराष्ट्रीयन तरुणांचा रोजगार गुजरात ला पळवून नेला. युवकांच्या रोजगार हिरवणारे ईडी सरकार महाराष्ट्र द्रोही असल्याच्या आरोप महिला शहर काँग्रेस अध्यक्ष तथा माजी महापौर संगीता अमृतकर यांनी केला आहे.
चंद्रपूर येथील गांधी चौक येथे आज महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनात महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शहर उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, चंदाताई वैरागडे, सुनीता अग्रवाल, राधिका बोहरा- तिवारी, पूजा आहुजा, वंदनाताई भागवत, ऐकता गुरूले, सकीना अंसारी, वीणाताई खनके, अनुताई दहेगावकर, अर्चना चिवंडे, शालिनीताई भगत, परवीन सय्यद, नाहींज काजी, अंधांना रामटेके, ललिता रेवल्लीवार यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, लाखो बेरोजगारांच्या रोजगार हिरावून देखील ते समाधानी नाही ,ह्यानंतर ह्या ED सरकारचे डोक्यावर पडलेले उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या महाराष्ट्रीयन तरुणाई च्या तोंडाला पाने पुसत म्हणतात की , युवकांनो तुम्ही घाबरु नका ,आपल्या गुजरात चे सॉरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ बाबानां त्यांच्या कानात हळूच असे सांगितले आहे. की वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पा पेक्षा तुम्हाला आम्ही आणखीन मोठा प्रकल्प देऊ काळजी करू नका. ह्या मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता काय खुळी वाटते का हो. किती खोटे बोलावे त्याला काही सीमा आहे का नाहीं. हे ED सरकार म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र सरकार मोठा प्रकल्पा येणार असे सांगून खोटी समजूत काढीत एक प्रकारचे गाजर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील सर्व तरूण पिढीला दाखवीत आहेत. आमच्या महाराष्ट्रतील सव्वा लाख तरुणांना बेरोजगार करण्याचे हे कट कारस्थान करणाऱ्या सरकार चा आम्ही जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. पुढे देखील तरुणांनी या आंदोलनात पेटून उठण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.