सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील लिपिकास पकडले
शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या गोपालकृष्ण उमाजी पेन्टेवार यास लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली. तो मूळचा कार्यालय अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य) चंद्रपुर येथे वरीष्ट लिपीक पदावर आहे. Zilla Parishad
दि. १३ / ० ९/ २०२२ तक्रारदार हे मौजा तळोधी (ना.) तह . चिमुर जि . चंद्रपुर येथील रहीवासी असून, सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक आहे. तक्रारदार यांचे पेंन्शन केस पेपर मा . महालेखापाल कार्यालय नागपुर यांचेकडे पाठविण्याच्या कामाकरीता गोपालकृष्ण उमाजी पेन्टेवार , वरीष्ट लिपीक यांनी तक्रारदाराकडे ५,००० / - रु . ची मागणी केली. त्या तक्रारीवरुन आज दिनांक १३ / ० ९ / २०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी व सापळा कार्यवाही दरम्यान गोपालकृष्ण उमाजी पेन्टेवार , वरीष्ट लिपीक यांनी तक्रारदाराकडे तडजोडअंती ४,००० / -रु . लाचेची मागणी करुन स्वतःहा स्विकारल्याने जिल्हा परीषद कार्यालय चंद्रपुर कार्यालयाच्या समोरील गेट जवळ पकडण्यात आले.
पुढील तपास कार्य सुरु आहे . सदरची कार्यवाही ही श्री . राकेश ओला , पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक , ला.प्र.वि. नागपुर , श्री . मधुकर गिते , अप्पर पोलीस अधिक्षक , ला.प्र.वि. नागपूर , तसेच पोलीस उपअधिक्षक श्री . अविनाश भामरे , ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे , तसेच कार्यालयीन स्टॉफ पो.उप.नि. रमेश दुपारे , नापोकॉ . नरेश नन्नावरे , पो.अ. रविकुमार ढेंगळे , वैभव गाडगे , आमोल सिडाम , म.पो.अ. मेधा मोहुर्ले , पुष्पा कोचाळे हे सर्व ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे . यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात येत आहे .