गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे इरई धरणाचे गेट क्रमांक 1 आणि 7 0.25 मिटरने उघडण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चंद्रपूर जिल्हात दिनांक 14 ते 18 सप्टेंबर 2022 रोजी आकाश ढगाळ राहून दिनांक 14 ते 16 सप्टेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक 17 व 18 सप्टेंबर रोजी विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिनांक 14 सप्टेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे .
सततच्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. आज धरणाची उच्चतम पातळी २०७.३५० मीटरने गाठली आहे. त्यामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.