ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे आज दुपारच्या सुमारास शेत शिवारात वीज पडून एक महिला ठार व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शामला वासुदेव लोळे वय पन्नास वर्षअसे मृतक महिलेचे नाव आहे ज्योती निलेश पोहनकर वय 25 वर्ष असे जखमी महिलेचे नाव आहे.
तालुक्यात सर्वत्र धान पिकातील निंदणाचे काम सुरू आहे आज आवळगाव येथील नथुजी नरुले यांच्या शेतावर गावातील महिला शामला कोरे ज्योती पोहनकर यासह अन्य पाच-सात महिला निंदणाच्या कामाकरिता गेल्या होत्या आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नथुजी नरुले यांच्या शेतातील बांधावरील झाडाखाली महिला जेवण करायला बसल्या होत्या दरम्यान अचानक वीज कोसळल्याने श्यामला लोळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला व ज्योती पोहनकर ही गंभीर जखमी झाली घटनेची माहिती गावात पसरतात गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमी महिलेला आरमोरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मेंडकी पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आली विज पडून महिलेचा मृत्यू झाल्याने आवळगावात शोककळा पसरली आहे.
Chandrapur brahmapuri avadgaon women rain
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, सप्टेंबर ११, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
‘आयुष्मान भारत’ कार्ड असेल तरच मिळणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार Ayushman Card Online ApplyØ चंद्रपूर जिल्ह्यात नऊ लाख 23 हजार लाभार्थी
आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी करीता “'पोलीस काका-पोलीस दीदी” उपकमचंद्रपूर:सद्याच्या बदल्या आधुनिक जिवनशैली मुळे सद
सिंदेवाही पो. स्टेशन येथे मातोश्री अकॅडमी तर्फे 'मार्गदर्शन शिबिर' | ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाही;
श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजराचंद्रपुर:आज दि.०५/०९/२०२३ ला श्री साई औद्योगिक प्
व्हिडीओ चित्रफीत बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे मागितली ५० लाखाची खंडणी | व्हिडीओ चित्रफीत बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे माग
नायलॉन मांजा विक्री केल्यास इतका मोठा होईल दंड | Ban Nylon Manja चंद्रपूर शहरात नायलॉन मांजाविरुद्ध मनपा करणार कड
- Blog Comments
- Facebook Comments