Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

भाजयुमोच्या मागण्या मान्य : महामेट्रोला दिले निवेदन |


भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळानी आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची भेट घेतली. या बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा झाली. महामेट्रो मध्ये एव्हाना ११००+ इतके कामगार कंत्राटी तत्वावर काम करतात, कामगारांचे तसेच काही महत्वाचे विषय आहे ज्यावर आज भाजयुमोने दिक्षित यांच्या सोबत चर्चा केली. (Bjp Metro)


विषय खालील प्रमाणे  


मुद्दा क्र. १. कामगारांना राज्य शासनाच्या नियमांनी पगार दिला जातो, पण कामगार कोर्टात गेले असता त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनी पगार दिला जावा असा माननीय कोर्टाचा आदेश आहे. पण तरीही सुद्धा अजूनही कामगारांना राज्य शासनाच्या नियमांनी पगार दिला जातो. त्यावर त्वरित निर्णय घेऊन केंद्र शासनाच्या नियमांनी पगार दिला जावा सोबत कोर्टाचा ऑर्डर जोडला असून तो विचारात घ्यावा अशी मागणी युवा मोर्चातर्फे करण्यात आली. या मुद्यावर बोलतांना दिक्षित यांनी सांगितले की याबाबत आम्ही कामगार आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी पुनर्याचिका दाखल केली आहे.


मुद्दा क्र. २.  ग्रेट वॉल कंपनीच्या माध्यमातून कामगार कंत्राटी नौकरी करत असताना ग्रेट वॉल कंपनीच्या आंतरिक जी. एस. टी च्या विषयामुळे त्यांना २/३ महिन्याचा पगार उशिरा मिळाला ज्याच्या निषेधात कामगारांनी काली फिथ बांधून आंदोलन केले होते. ज्यावर कारवाई म्हणून (युवा मोर्चाला असलेल्या माहितीनुसार) महा मेट्रोने ग्रेट वॉल कंपनीला दंड लावला होता. पण ग्रेट वॉल कंपनीने तो दंड सुद्धा कामगारांकडून वसूल करण्याचे पाप केले आहे . वारंवार विनंती केल्यावर सुद्धा त्यांनी केवळ ७ लोकांचे पैसे परत केले बाकीच्यांचे पैसे बेहिशेबी कापले आहे. ते सुद्धा त्वरित कामगारांना परत करण्यात यावे. या मुद्यावर दिक्षित यांनी सहमती दर्शविली जर कामगारांचा पैसा कापला असेल तर त्यांना त्यांचा पैसा वापस मिळेल अशी ग्वाही दिली व तात्काळ कारवाही करून ज्या कामगारांचे पैसे कापले आहे त्यांना परत करू असे सांगितले. यामुळे भाजयुमोच्या मागणीला यश मिळाले.


मुद्दा क्र. ३. कंत्राटी तत्वावर नव्या एजन्सी ला काम गेले आहे. नवी एजन्सी काही लोकांना कमी करण्याचा विचारांत आहे. या मुद्यावर देखील दिक्षित यांनी सहमती दर्शविली व एजंसी बदलल्यामुळे कुठल्याही कामगाराला कमी केले जाणार नाही अशी ग्वाही दिली. 


मुद्दा क्र. ४. मेट्रोच्या पिलरवर आजवर आम्ही कुणीही जाहिरात लावलेली नाही. पण असे आढळून आले आहे की मेट्रोच्या पिलरवर काही जाहिराती आणि मजकूर आहे, त्यांच्यावर कुठलाही दुजाभाव ना ठेवता त्वरित आणि कठोर कारवाई मेट्रो ने करावी जेणेकरून मेट्रोचे सौंदर्य अबाधित राहील. या बाबत दिक्षित यांनी सांगितले की आम्ही यावर तात्काळ कारवाही करू.


भारतीय जनता युवा मोर्चानी वरील ४ ही मुद्यांवर कारवाही झाली नाही तर मेट्रो प्रशासनाला सक्त ताकीद दिली आहे की सर्व मुद्यांवर तोडगा काढावा अन्यथा युवा मोर्चा येणार्या काळात उग्र आंदोलन करेल. 


आजचे आंदोलन प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. यावेळी प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले,  प्रदेश सदस्य देवा डेहणकर, सारंग कदम, शहर महामंत्री दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मंडळ अध्यक्ष निलेश राऊत, अथर्व त्रिवेदी उपस्थित होते.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.