Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर ०४, २०२२

राज्यातील कंत्राटी कर्मचा-यांनी संघटित होवुन महाराष्ट्रात चळवळ उभारावी - श्रीकुमार | All India State Employees Federation


चंद्रपुर (प्रतिनिधी) दिनांक 03.09.2022 | 
कंत्राटी व आउटसोर्सिगद्वारे विविध विभागात सेवा देणारे कर्मचारी यांना कुठल्याही सेवा सुविधा न देता शासनाचे काम नियमित करतात काम करतांना त्याची खुप हाल होतात, व योग्य मोबादला सुध्दा मिळत नाही, कामाच्या ठिकाणी हिन वागणुक दिल्या जाते, नौकरीत कुठल्याही प्रकारची हमी नाही अशा अवस्थेतुन कंत्राटी कर्मचा-यांना मुक्त होण्यासाठी व न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचा-यांनी संघटित होवुन राज्यव्यापी चळवळ उभारावी असे मत अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव श्रीकुमार (Shree Kumar) यांनी चंद्रपुर येथिल आयोजित महाराष्ट्र राज्य कंत्राटी व बाहयस्त्रोत कर्मचारी महासंघाच्या परिसंवाद कार्यक्रमांत मार्गदर्शन प्रसंगी व्यक्त केले.  All India State Employees Federation

कंत्राटी कर्मचा-यांच्या सर्वागिन समस्या सोडविण्यासाठी एकत्रित येवुन जनचळवळ  उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी व बाहयस्त्रोत कर्मचारी च्या महासंघाच्या वतीने कन्न्मवावर सभागृह जिल्हा परिषद, चंद्रपुर येथे एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होत. कार्यक्रमांची प्रस्ताविक जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शालिक माउलीकर यांनी केले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव श्रीकुमार उपस्थित होते प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अशोक थुल, राज्य् कर्मचारी मध्यवर्तीय संघंटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे, सि.आय. टी. यु. चे जनरल सेक्रेटरी अरुन लाटकर यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.  All India State Employees Federation

        अशोक थुल मार्गदर्शनापर बोलतांना म्हणाले की कंत्राटी कर्मचा-यांना दबावाखाली काम करावे लागते त्यामुळे आपली नौकरी जाईल याभितिने चळवळ किंवा संघटना उभारली जात नाही कंत्राटी कर्मचा-यांनी आपले न्याय हक्क सरकार दरबारी माडण्ययाकरीता कुणालाही न घाबरता कुठलीही मनात भिती न बाळगता अन्यायाच्या विरोधात चळवळीच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे. 


जनचळवळी शिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले.  अशोक लाटकर मार्गदर्शन पर बोलतांना म्हणाले की सर्व क्षेत्रात कंत्राटीकरण व आउुटसोर्सिगचे प्रमाण वाढले असुन कंत्राटी कर्मचा-यांच स्वतंत्र झालेल्या देशात शोषण असुन याचे भविष्यात गंभिर परिनाम पाहायला मिळेल या  परिस्थितीचा सामना करतांना न घाबरता एकत्रित यावे असे मत व्यक्त केले. अशेाक दगडे मार्गदर्शनपर बोलतांना म्हणाले की , भारतात 80 टक्के  असंघटित कामगार असुन प्रत्येक क्षेत्रात वाढते खासगीकरण हे धोक्याची घंटा आहे. वाढत्या खाजगीकरणात विरोधात चळवळ मजबुत करुन जन आंदोलन करण्यास तयार राहावे जन आंदोलनाशिवाय पर्यांय नाही, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमांला जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महानगरपालिका याशिवाय विविध शासकीय विभागातील कंत्राटी व बाहयस्त्रोत कर्मचारी मोठया संख्येन उपस्थित होते.   All India State Employees Federation



कार्यक्रमांचे सुत्रसंचालन एनआरएचएमचे राकेश नाकोडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कृष्णकांत खानझोडे, प्रविण खंडारे, सुर्यकांत  भडके, दिलीप चौधरी, प्रविण नागपुरे, अरुन चौधरी, प्रविण कुमरे, नरेंद्र नगराळे,  अर्शिया शेख, सुनिल नुत्तलवार, लारेंन्स खोब्रागडे, हर्षवर्धन गजभिये, यांनी अथक परिश्रम घेतले.  All India State Employees Federation

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.