जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त 18 कुटुंबांना आर्थिक मदत मंजूर
नागपूर,दि. 05 : विविध कारणास्तव आयुष्य संपविण्याच्या दुर्दैवी निर्णय घेणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील 18 कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.
Collector Dr. Vipin Itankar
शेतकरी आत्महत्या प्रकरणातील जिल्हा निवड समितीने 25 प्रकरणांपैकी आज 18 प्रकरणांना मंजुरी दिली. या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली.
जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यांची तालुकास्तरावर व उपविभागीय स्तरावर चौकशी केल्यानंतर ही प्रकरणे जिल्हा समिती पुढे आली होती. गेल्या तीन महिन्यातील ही प्रकरणे आहेत.यातील सहा प्रकरणे फेर तपासणीसाठी आली होती.जुनी सहा प्रकरणे व नवीन 19 प्रकरणे यापैकी 18 प्रकरणांना जिल्हा समितीने मान्यता दिली.या कुटुंबांना एक लक्ष रुपयाची मदत शासनातर्फे दिली जाणार आहे. यामध्ये 30 हजार रुपये नगदी तर 70 हजार ठेव ठेव म्हणून देण्यात येते.
आजच्या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ मिलिंद शेंडे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुरंदरे, उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांच्यासह विविध तालुक्यातील तहसीलदार उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
Collector Dr. Vipin Itankar Nagpur