चंद्रपूर (khabarbat Chandrapur):
कृषि विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीस उदया दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ पासून जिल्हा परिषद (Zilla parishad) परिसरात सुरूवात होत आहे.
स्वयंसहाय्यता समुहांकडून उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वस्तुंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्याचे प्रदर्शन व स्वत:मध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठीचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये संबंधीत व्यवसायीक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांबपेाळी, पुरणपोळी, झुनका भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळखत, गोमुत्र अर्क, चा समावेश आहे. या सोबतच स्वंयसहाय्यता समुहांचे खादयपदार्थाचे स्टॉल्स राहणार आहेत. यात पुरणपोळी, शाहाकारी तसेच मांसाहारी जेवण, झुणका भाकर, लांब पोळया आदीचा समावेश आहे.
कृषी विभागाकडून विविध साहित्य आणि लागवड पदधतीचे सादरीकरण केले जाणार आहे. चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. Mitali sethi