Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १२, २०२२

Zadipatti Natya Sammelan | चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन 17 व 18 सप्टेंबरला ब्रम्हपुरी येथे


Chandrapur News | Google News | 

चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन 17 व 18 सप्टेंबरला ब्रम्हपुरी येथे होणार आहे. नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष Vijay Wadettiwar उपस्थित राहणार असून ब्रम्हपुरीत झाडीपट्टी नाट्य संमेलन यशस्वी होईल हा विश्वास आहे.

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वी त्याला झाडीमंडळ नावाने ओळखले जायचे. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली झाडीबोली या नावाने प्रचलित आहे. या भागात गेल्या 150 वर्षांपासून लोककलावंत नाटक हा कलाप्रकार सादर करत आहेत. दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की इथल्या नाटकांना प्रारंभ होतो.
विदर्भात शहरीकरणाचे वारे वाहू लागले असले तरी इथल्या नाट्यसंस्कृतीने आपली प्राचीन परंपरा जपली आहे. वैदर्भीय शेतकऱ्यांचे नाटकावर फार प्रेम आहे. बऱ्याच कालावधीनंतर संमेलन होत आहे. झाडीपट्टी नाट्य संमेलनामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालंय. नाट्यकलावंत व रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या संमेलनामुळे देशात झाडीपट्टीची आणखी एक वेगळी ओळख निर्माण होईल.
chandrapur news chandrapur india news 34 chandrapur chandrapur breaking news today chandrapur pin code chandrapur temperature chandrapur weather chandrapur news chandrapur district chandrapur map chandrapur to pune train is pc chandra open today chandrapur express news chandrapur district news news of chandrapur Facebook Post


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.