Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १२, २०२२

Political Breaking News | महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
आशिष शेलार मुंबईचे भाजप अध्यक्ष..


Maharashtra BJP राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांर्तगत पदाधिकारी बदलांच्या हालचालींना वेग आला. भाजपमध्ये राज्यातील विविध पदांच्या बदल्या होण्याची शक्यता होती. प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली.  (BJP State President)





मुंबई Mumbai आणि maharashtra news महाराष्ट्र दोन्ही पदांसाठी लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचीही माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना पसंती देण्यात आली  आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी आशिष शेलार हे आक्रमक असल्याने त्यांचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहरा देण्यात आल्याचीही चर्चा आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्रीपद आल्याने प्रदेशाध्यक्ष विदर्भाकडे देण्यात आले. 

*श्री. चंद्रशेखर कृष्णराव  बावनकुळे यांचा जीवन परिचय* 

जन्म : १३ जानेवारी, १९६९. 
जन्मस्थान : खसाळा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. 
शिक्षण :  बी.एस्सी. 
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.  
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती ज्योती बावनकुळे. 
अपत्ये : संकेत बावनकुळे व सौ पायल आष्टणकर  
व्यवसाय : शेती. 
पक्ष : भारतीय जनता पक्ष. 
मतदारसंघ : नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था.  
इतर माहिती : अध्यक्ष, श्रीक्षेत्र महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी, 
कोराडी पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष योगदान
अनेक सामाजिक मेळाव्यात सहभाग
कोरोनाच्या काळात आरोग्य शिबिरांचे आयोजन 
अध्यक्ष, जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान, कोराडी 
अध्यक्ष, महालक्ष्मी जगदंबा बिगर शेती सहकारी संस्था नांदाकोराडी 
१९८८ - ९५ : छत्रपती सेना व विद्यार्थी संघटनेत कार्य 
१ ९९० - ९५ अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचे कार्य; कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी लढा, न्याय मिळवून देण्याकरीता आंदोलनात सहभाग व अटक; 
१९९५ - ९९ : उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा युवा भारतीय जनता पक्ष 
१९९९ - २००१ जिल्हा सचिव, भारतीय जनता पक्ष, नागपूर, 
२००९ - २००४ संघटन प्रमुख, कामठी भारतीय जनता पक्ष; 
२०१० - २०११ नागपूर जिल्हा अध्यक्ष, भाजप; 
२०१४ महाराष्ट्र प्रदेश सचिव, भारतीय जनता पक्ष; 
१९९७ - २००२ व २००२ - २००४ सदस्य, जिल्हा परिषद, 
१९९७ - २००२ सदस्य, आरोग्य व बांधकाम समिती; 
२००२ - २००४ गटनेता भाजप व सेना, जिल्हा परिषद, नागपूर, 
२००४ - २००९, २००९ - २०१४ व २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, 
विधिमंडळाच्या पंचायत राज, सार्वजनिक उपक्रम व ग्रंथालय समितीचे सदस्य
डिसेंबर, २०१४ ते २०१९ पर्यंत ऊर्जा, नवीन व नवीकरण ऊर्जा खात्याचे मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री. 
जानेवारी २०२२ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड. 
परदेश प्रवास : युके व दुबई इत्यादी देशांचा दौरा. 
छंद : वाचन व सामाजिककार्य. 
पत्ता : प्लॉट नं. २८ - अ, श्रीजगदंबा, नवीन कोराडी, पोस्ट - न्यू कोराडी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर- ४४११११. 
भ्रमणध्वनी : ९०४९४०४०४० / ९०४९४४४४४४. 
ई - मेल : chandrashekharbawankule@gmail.com


 breaking news |  breaking news headlines
 news live |  google news |  local news |  azadi ka amrut mahotsav


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.