Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ०९, २०२२

ठिय्या आंदोलनाची आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी घेतली दखल


शेवटी आदिवासी प्रकल्प कार्यालायाचे प्रकल्प अधिकारी यांनी राजुरा येथील आदिवासी वसतिगृहात दिला प्रवेश*

श्रमिक एल्गार व ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन च्या प्रयत्नाला यश


दोन महिन्यांपासून आदिवासी विध्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत*




राजुरा / प्रतिनिधी

जिल्ह्यात आदिवासी वसतिगृह शाळा सुरू होऊन डिड महिना लोटूनही सुरू झाले नाही राजुरा येथील वसतीगृहात मागील वर्षी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना अजूनही प्रवेश दिला नाही यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत यामुळे त्यांच्यात कमी पणाची भावना निर्माण होत आहे असे असताना आदिवासी प्रकल्प कार्यालयाने कोणतीही व्यवस्था केली नाही. याची दखल घेऊन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष व ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी प्रकल्प अधिकारी यांना दि. 3/8/2022 ला राजुरा येथील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे असे निवेदनातून कळविले होते मात्र प्रकल्प अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेतली नाही यामुळे आज दि 8/8/2022 ला आदिवासी प्रकल्पकार्यालय चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.



याची दखल आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहन घुघे यांनी घेऊन राजुरा येथील वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला यामुळे श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रविण चिचघरे,ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम, विद्यार्थी रोहीत छत्रपती पेंदोर, रितिक सहदेव कुमरे, प्रज्वल विजय कुमरे, उज्वल सुरेश आत्राम, आकाश चिंतामन तलांडे, खुशाल मनीराम कुळमेथे, अभिषेक संदीप टेकामठिय्या आंदोलनात उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.