ब्रम्हपुरी | Brahmapuri तालुक्यात १६ ऑगस्टला दुधवाही येथील शेतशेत शिवारात मुखरू राऊत याला वाघाने ठार केले तर पद्मापूर येथे गुराखी प्रभाकर मडावी याला वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानांच आज सलग दुसऱ्या दिवशीही १७ ऑगस्टला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अड्याळ शेत शिवारात वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. विलास विठोबा रंधये वय ४८ वर्ष रा. मेंढा असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. Chandrapur News
ब्रह्मपुरी () वरून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या अड्याळ जंगलव्याप्त शेतशिवारात मेंढा या गावच्या रहिवासी विलास विठोबा रंधये यांची शेती आहे. ते आपल्या शेतीमध्ये निंदनाचे काम सुरु असल्याने देखरेखीकरिता गेले होते. विलास रंधये हे आपल्या शेतावरील बांधावर उभे होऊन पाहणी करीत असताना वाघाने मागून झडप घेऊन त्यांना जागीच ठार केले. या परीसरातील शेती हि जंगलव्याप्त भागत असून निंदननाची कामे जोमात सुरु आहेत . वाघाने सलग दुसऱ्या दिवशीहि हल्ला करून दोन दिवसात दोघान ठार केल्याने परीसारतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नरभक्षक वाघाला ठार मारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काल झालेल्या वाघाच्या हल्ल्यानंतर वाघाच्या हल्ल्याबाबत खासदार अशोक नेते माजी आमदार प्रा. अतुल देशकर (Atul Deshkar) यांनी उप वन संरक्षक दीपक मल्होत्रा यांची भेट घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले होते.
Chandrapur News 34 MH 34 | Chandrapur News