Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २१, २०२२

गावकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; मागणी काय? ते नक्की वाचा


बेलसनी गावाला पुराने वेढले, ना खासदार, मंत्री पोहोचले ना आमदार

मदत न मिळाल्यास गावकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा


Special story by Roshan Duryodhan
चंद्रपुर जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस बरसला व अतिवृष्टी झाली. वर्धा,निम्न वर्धा, अप्पर वर्धा धरण,इरई,पैनगंगा, वैनगंगा अशा सर्वच नदी दुथडी भरून वाहू लागल्या.त्यातच तालुक्यातील बेलसनी (Belsani) गावात पूर आला आणि होत्याच नव्हतं झालं. गावात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले, अनेकांच्या घरात पाणी शिरले.तर शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली.

All the rivers like Wardha, Lower Wardha, Upper Wardha Dam, Erai, Painganga, Wainganga overflow.

यात 90 टक्के शेतीवरील कापूस,तूर, सोयाबीन संपूर्ण पिकांचे मोठे नुकसान झाले.मात्र शासनाकडून अजूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. एवढे सर्व होऊन सुद्धा या गावात ना आमदार,ना मंत्री, ना खासदार पोहोचले. त्यामुळं नागरिकांनी रोष व्यक्त केला असून नुकसानभरपाई न मिळाल्यास आत्मदहन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


बेलसनी गावातील शेतकऱ्यांची शेती वर्धा नदी पलीकडे आहे.तर गावात काही शेतकऱ्यांची शेती आहे. बेलसनी येथील काही जमीन वेकोलीने भूसंपादीत केली आहे.त्या ठिकाणी वेकोलीचे काम सुरू असून त्या जमिनीवर वेकोलीने ओव्हर बर्डन चे काम सुरू करून माती डम्पिंग चे काम सुरू केले आहे. त्यामुळं वर्धा नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली.पूर्वी वर्धा नदीचे पाणी गावात किंवा शेतात येत नव्हते.मात्र वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे वर्धा नदीचे पाणी गावात व शेतकऱ्यांच्या शेतात आल्यानं होत्याच नव्हतं झालं.

Belsani is a Village in Chandrapur Taluka in Chandrapur District of Maharashtra State, India. It belongs to Vidarbh region . It belongs to Nagpur Division .

Wcl वेकोलीच्या ढिसाळ नियोजनामुळे वर्धा नदीचे (Wardha River) प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले.आणि डोळ्यादेखत उभे पीक संपूर्ण उध्वस्त झाले.खरीप हंगाम संपूर्ण वाया गेला असून शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा मोठा बोजा वाढला आहे.त्यामुळं शासनाने व वेकोलीने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.