यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील माजी खासदार ओ.बी.सी नेते आणि प्रमुख ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) आणि धनराज वंजारी, भाई अमन यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी पक्ष प्रवेश केला आहे.
हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत. तसेच ते बंजारा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. तर धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी आणि विदर्भाचे नेते आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष होते. आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी याबाबत माहिती दिली. धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी, विदर्भाचे नेते आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्षही राहिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कार्याची सर्वदूर प्रशंसा झाली आहे. त्यांच्या ‘काम की राजनीती’मुळे प्रभावित होऊन मी आज आम आदमी पार्टीत सामील झालो आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तसेच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिली आहे.
सामाजिक कार्य :
* राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाची स्थापना सन 1991
* भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष 1999-2004
* रेणके आयोग स्थापन करण्यामध्ये महत्वाची भुमिका
* तिसर्या सुचीसाठी संसदेध्ये प्रायव्हेट बिल 2008
* देशातील 22 कोटी भटक्या विमुक्त समाजाला संघटीत करण्याचे काम
* महाराष्ट्रभर शाखा तसेच इतर राज्यात शाखा
* पहीली शाखा बुलढाणा जिल्हयातील घाटबोरी ता. मेहकर येथे स्थापन करण्यात आली.
उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार :
1) राष्ट्रपती मा. प्रणव मख्w यर्जी याच्ं या हस्त o प्रदान 2012 इद्रं प्रस्थ इटंरनशॅनल नवी दिल्ली या प्रतिष्ठीत संस्थेचा कवी दिनकर साहित्य सेवा पुरस्कार
2) महाराष्ट्र शासनतर्फे वसंतराव नाईक समाजभूषण-पुरस्कार राज्यपाल मा.के.शंकर नारायनन यांच्या हस्ते प्रदान (सन2014)
3) सामाजिक योगदानाबददल राज्यातील अनेक सामाजिक संस्थार्फत विविध पुरस्काराने सन्मानित. समाज भूषण, बंजारा भूषण.