Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

Political News | पक्ष टिकवण्यासाठी राज ठाकरेंनी स्वभाव बदलण्याची गरज |

 राज ठाकरेंनी जेष्ठ,अनुभवी नेत्यांना 'मनसे'त स्थान द्यावे-हेमंत पाटील


मुंबई / पुणे


सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघा.आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भेटीगाठी वाढवण्याच्या सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली होती.तसेच लवकरच ते राज्यव्यापी दौरा करणार असून येत्या २५ ऑगस्टपासून मनसेची सदस्य नोंदणी सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.




 परंतुपक्ष विस्तारासाठी मुळात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्याचा रागीट आणि हट्टी स्वभाव बदलावाअसे आवाहन राजकीय विश्लेषक आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी केले.राज ठाकरे जोपर्यंत त्यांचा स्वभाव आणि पक्षाची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत  पक्ष संघटन वाढणार नाहीअसा दावा देखील त्यांनी केला. Rajthakarey hemant patil Political News

 


ठाकरे म्हणजे मनसे आणि मनसे म्हणजे ठाकरे असे समीकरणच झाले आहे.त्यामुळे संघटन विस्तारासाठी उत्कृष्ट वक्त्यासह कुशल संघटक असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. या शिवाय ठाकरे यांनी प्रत्येक विभागात चांगल्या पद्धतीने काम करणारे जेष्ठ,अनुभवी आणि हुशार राजकारणी लोकांना स्थान दिले पाहिजे. केवळ तरुण,अनुभवहीन आणि हुल्लडबाजी करणाऱ्या घेऊन पक्षाचे आमदार-खासदार निवडून येणार नाही.उत्तम राजकीय स्थितीची जान असणारे आणि पक्ष विस्ताराला समर्पित अश्या कार्यकर्त्यांची फळी ठाकरेंना उभारावी लागेल.




 

सोबतच सामाजिक चळवळीची पार्श्ववभूमी असलेल्यांना मनसेत स्थान दिले पाहिजे.असं केल्यावरच मनसे पुढे जाईल. नाही तर केवळ भाषणापुरते मर्यादित असलेले राज ठाकरे यांच्या सभेत होणारी लोकांची गर्दी मतदानात परावर्तित होणार नाही. मतदार केवळ टाळ्या वाजून श्रोते म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडतील. ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे. हट्टीपणा ,रागीट  स्वभाव बदलला पाहिजे.मनमिळाऊ स्वभाव अंगिकारला पाहिजे.संघटन कौशल वाढवले पाहिजेलोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. तेव्हाच सर्वसामान्यांना मनसे आपला पक्ष वाटेल,  असे मत पाटील यांनी व्यक्त केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.