सोईट -माढेळी वरोरा ते वणी वरोरा प्रस्तावित बाय पास रोडच्या बांधकामाकरिता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला पाठपुरावा
वरोरा तालुक्यातील सोईट -माढेळी वरोरा ते वणी वरोरा प्रस्तावित बाय पास रोडच्या बांधकामाकरिता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या मालकीची संपादीत जमिन डब्लु सी एल माजरी एरिया कुचना यांना हस्तांतरण करण्याकरिता मंजुरी देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले. Radhakrishna vikhe patil
कार्यकारी अभियंता चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक क १ चंद्रपूर यांच्या ताबा असलेली जमिन दिंडोरा बॅरेज प्रकल्पाच्या पाईप लाईन व रस्त्याच्या कामासाठी सेंट्रल इंडिया पॉवर कंपनी भद्रावती येथील औष्णिक वीज केंद्राकरिता दिंडोरा बॅरेज प्रकल्पातून पाईपलाईन व रस्त्यांच्या बांधकामाकरिता करण्यात आली होती.
परंतू सदर जागेवर औष्णीक केंद्र उभे न झाल्याने राखीव रस्त्याची जमिन पडीक आहे. या संदर्भाने माजी जलसंपदा मंत्री महोदय यांना मा. खासदार बाळू धानोरकर यांनी २८/११/२०२० रोजी पत्र देऊन वरोरा शहरातील कोळसा व अन्य जडवाहतूक वळण मार्गाने वळविण्यास व शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याकरिता वरिल जागा देण्याची विनंती केली होती. Warora bhadrawati
सदर संपादीत जमिनीचा रस्त्याच्या कामाकरण्याकरिता संपादीत जमिनीचे भुधारक पी.डब्लु तडस रा. चंद्रपूर यांनी निवेदन सादर केले होते. यावर वरोरा शहरातील वाढत्या रहदारीच्या दृष्टीने पर्यायी जागा भुमापन क्रमांक १२/६५ /१९९६-९७ मौजा वरोरा येथील सदर जमिन कार्यकारी अभियंता चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक १ चंद्रपूर यांना सदर जमिन आपल्या विभागात आवश्यकता आहे काय ? या संदर्भात विचारणा करण्यात आली होती.
या विषयाच्या अनुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ८.७७ हेक्टर आर जमिनीपैकी ५.७५ हेक्टर आर जमिन एरिया जनरल मॅनेजर मांजरी एरिया यांना हस्तांतरीत करण्याचा शासन स्तरावर प्रस्ताव मंजुर झाला.
त्यामुळे डब्लु सी एल च्या हस्तांतरीत करण्यात आलेल्या जागेवर वरोरा बायपासची निर्मिती करुन वरोरा शहरात होणा-या अपघाताचे प्रमाणे कमी करता येईल, या अनुषंगाने प्रधान सचिव, मुंबई यांना दिनांक २१ जुन २०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठविले असुन सदर पत्रानुसार त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
MLA Pratibha Dhanorkar followed up for the construction of bypass road News 34, MH34 pincode