नागपूर मनसेची भव्य दहीहंडी जल्लोषात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण - पश्चिम विधानसभा मनसेतर्फे आयोजित *भव्य दहीहंडी* उत्सवाचा कार्यक्रम सोनेगाव परिसरातील सहकार नगर येथील गजानन महाराज मंदिर जवळील मैदानात *गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट* रोजी *सायंकाळी* शहरातील आमंत्रित मान्यवर मंडळी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
मनसेच्या दहीहंडीत नागपुरातील सहा बलाढ्य गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदविला, भंडारा जिल्ह्यातील एक गोविंदा पथक तसेच दोन महिला गोविंदा पथकांचे प्रदर्शन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित महिला भगिनींच्या आकर्षणाचे केंद्र राहिले.
*कार्यक्रमाला उपस्थित पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार, न्यूज मीडियाच्या प्रसिद्ध वार्ताहर सरीता कौशिक, माजी रणजी क्रिकेटपटू श्री हेमंत वसू व श्री मनोहर अगस्ती, सुप्रसिद्ध डॉक्टर श्री अनुप मरार, ज्येष्ठ नागरिक श्री वसंत पाटील यांचेसह विविध क्षेत्रातील आमंत्रित मान्यवर मंडळीचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष श्री अजय ढोके, आयोजक विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे व मनसे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी गोविंदा पथके आणि उपस्थित नागरिकांची मनसे दक्षता समितीतर्फे काळजी घेण्यात आली.
कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आयोजन केल्याबद्दल *पोलिस आयुक्त श्री अमितेशकुमार* यांनी मनसे पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना सांगितले की, नागपूर पोलिस सदैव जनतेच्या संरक्षणासाठी तयार असून गुन्हेगारीला हद्दपार करण्यास कटिबद्ध आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने अबाधित कायदा व सुव्यवस्था राखू, नागरिकांसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत असे सांगताच उपस्थित जनतेने आत्मविश्वासाने टाळ्यांच्या गजरात पोलिस आयुक्तांच्या विचारांचे स्वागत केले.
ढोलताशांच्या गजरात नाचत.. *गोविंदा आला रे आला म्हणत*... तरुण मंडळी, गोविंदा पथके यांनी कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या पूनम खंडवानी यांच्या खुमासदार संचालनात चवथ्या फेरीत सहा थरांच्या वर असलेल्या दहीहंडीला फोडण्यात यश मिळविले. या विजयाचा मान नागपूरातील जय भोलेश्वर गोविंदा पथकाने मिळविला.
*मनसेतर्फे प्रथम पारितोषिक रुपये ७५,०००/- व मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी चमूला रुपये ५,०००/- उत्तेजनार्थ पारितोषिक व मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.*
*कार्यक्रमाला विशेष सहकार्य दिल्याबद्दल सोनेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री दिलीप सागर व सहकारी पोलिस स्टाफ व उपस्थित परिसरातील नागरिक यांचे प्रदेश सरचिटणीस श्री. हेमंत गडकरी यांनी आभार मानले.
*कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेणारे आयोजक विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे व आयोजन समिती पदाधिकारी सर्वश्री चेतन शिराळकर, चेतन बोरकुटे, शिरीष पटवर्धन गुरुजी, हर्षद दसरे, राजू पोलाखरे, विपीन धोटे, देवेंद्र ठाकरे, जमशेद अन्सारी, रोशन इंगळे, गणेश मुदलीयार, प्रसन्ना पटवर्धन, संजय जोशी, पारस तांबोळी, मिलिंद जोशी, संजय करमचंदानी व इतर सहकारी यांचे शहर अध्यक्ष श्री अजय ढोके यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी सर्वश्री किशोर सरायकर, विशाल बडगे, सचिन धोटे, प्रशांत निकम, शाम पूनियानी, घनश्याम निखाडे, उमेश बोरकर, चंदू लाडे, योगेश चनापे, प्रकाश ढोके, संगीता सोनटक्के, प्रिया बोरकुटे, रचना गजभिये, अचला मेसन, मनीषा पापडकर, कल्पना चव्हाण, शालू इंगळे, ज्योती गोवरदिपे, नितीन बंगाले, आशिष वार्डेकर, अमर काळे, गोकुळ वरेकर, कुणाल तिडके, शशिकांत मांजरे, विक्रम गुप्ता, सागर लारोकर, साहिल बेहरे, उत्तम रागीट इत्यादी उपस्थित होते.
maharashtras । breaking news from maharashtra। breaking news maharashtra । latest news about maharashtra । latest news on maharashtra ।maharashtra news in hindi live । breaking news in maharashtra । breaking news of maharashtra । latest news in maharashtra । mah news
Maharashtra navnirman Sena dahi handi festival