मुंबई: आयुष्यभर काबाड कष्ट करून, तहान भूक विसरून आपल्या कुटुंबाकरिता राबणाऱ्या पण अपरिहार्य काराणास्तव कुटुंबाकडून दुर्लक्षित झालेले ज्येष्ठ नागरीक वृद्धाश्रमात वास्त्यव्य करतात. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीकाना देवदर्शना सोबतच चार दिवस कृषी पर्यटन केंद्रामधील सुखाच्या आठवणी घेऊन आयुष्यभर जगण्याची उर्जा देण्याकरिता किमान २१ अष्टविनायक दर्शन सहलीला विनामूल्य घेऊन जाण्याचा संकल्प 'आयडियल ऍग्रो टुरिझम एल एल पी' ने केला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सावी वर्षानिमित्त कृषी पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाकडे (DoT) नोंदणी असलेल्या कृषी पर्यटन केंद्रा मध्ये 'आयडियल ऍग्रो टुरिझम एल एल पी' तर्फे केवळ वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनकरीता २१ विनामूल्य अष्टविनायक दर्शन सहलींचे आयोजन करण्यांत येणार आहे. अष्टविनायक दर्शन यात्रे दरम्यान कृषी पर्यटन केंद्रा मध्ये प्रत्यक्ष शेती आणि संबंधित इतर कामांच्या अनुभवासह पारंपरिक पद्धतीच्या सात्विक भोजनाचा आस्वाद वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीकाना घेता येणार आहे.
१५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या एक वर्षाच्या कालावधी दरम्यान 'आयडियल ऍग्रो टुरिझम एल एल पी' तर्फे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ४ दिवसांच्या (सोमवार ते गुरुवार) एकूण २१ विनामूल्य अष्टविनायक दर्शन सहली आयोजित करण्यांत येणार आहेत. सदर ४ दिवसांच्या सहलीचा प्रवास खर्चासह सर्व खर्च (राहण्याचा व जेवणाचा) देणगीरूपाने संकलन केला जाईल. नाव नोंदणीकरीता वृद्धाश्रम चालकांनी ७३०३७७७७६६ या क्रमांकावर १५ ऑगस्ट२०२२ पूर्वी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, हि नम्र विनंती.