चंद्रपूरचे सुपुत्र आणि २०१४ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी डॉ.विपीन इटनकर (drvipinitankar) यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Vipin, IAS, Collector,
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर.यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नांदेडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली. मार्च २०२० मध्ये ते नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते.
त्यांनतर त्यांना अवघ्या ३-४ महिन्यात कन्यारत्न प्राप्त झाले. विशेष म्हणजे, डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नीला प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यात दाखल केलं. तेव्हा त्यांचे कौतूक झाले होते. खासगी हॉस्पिटल्सच्या सर्व सोयी नाकारत जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वास दाखविल्याने डॉक्टरही भारावून गेले.
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर.यांची बदली पुणे येथे महिला व बालकल्याण आयुक्त या पदावर झाली. त्यांनी जुलै २०२१ मध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली होती. त्यांना येथे काम करण्यासाठी अल्पकाळ मिळाला. नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर २०१४ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. देशातील प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) Indian Administrative Service (IAS) - Government of India परीक्षेत चंद्रपूरचे बिपीन विठोबा इटनकर हे राज्यात पहिले आले होते. राष्ट्रीय रॅकिंगमध्ये त्याचा १४ वा क्रमांक होता. त्यांनी एमबीबीएस नागपूर येथील India Gandhi government medical college शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण झाली. ते मूळचे चंद्रपूरचे असून, पठाणपुरा रहिवासी आहेत.