आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने चंद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे,उपविभागीय पोलिस अधिकारी नंदनवार यांच्या मार्गदर्शना खाली शहरातून पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला.
येणारा गणेश उसवा निमित्त जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पूर्व तयारी म्हणून मुख्य रस्त्याची पाहणी त्यावेळी SDPO नंदनवार, सिटी पोलीस निरीक्षक सुधाकर अभोरे, रामनगर पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उपनिरीक्षक सुजित बंडीवार व कर्मचारी उस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेश भक्तांकडून तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडूनही उपाययोजना व तयारीला वेग आला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून गणेशोत्सव काळातील बंदोबस्तासंदर्भात नियोजन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
Chandrapur Police News | Ganeshotsav
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव माेठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी गणेश मंडळांकडून सुरू आहे. निर्बंध मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केल्याने गणेश भक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळातील पोलिस बंदोबस्तासंदर्भात गांभीर्याने नियोजन सुरू आहे.