Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०६, २०२२

ग्रामपंचायतीकडे मागितली ♦️♠️ पत्ते खेळाच्या व्यवसायासाठी परवानगी

आंध्र प्रदेशातील श्रीनिवास गुरम यांनी महाराष्ट्रातील राजुरा तालुक्यातील पेसा गाव असलेले अंतरगाव येथे पत्ते खेळण्याचा अड्डा सुरू करण्याच्या तयारीत



राजुरा तालुका येतील अंतरगाव ग्रामपंचायतीने दिनांक १२/०८/२०२२ रोजी होणाऱ्या ग्रामसभेचा नोटीस विषय सूची मधील ८ व्या क्रमांकावर आंध्र प्रदेशातील श्रीनिवास गुर्रम या व्यक्तीला राजुरा तालुक्यातील अंतरगाव या गावात कार्ड क्लब हाऊस (पत्ते खेळणे ) सुरू करणेसाठी परवानगी देणे बाबत विषय ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी विषय सूचित ठेवला आहे. Rajura
पेसा गावात अश्या प्रकारचा एखादा कार्ड क्लब सुरू करता येऊ शकतो काय ? सभेला १०० लोकांना उपस्थित ठेवून रजिस्टर वर त्यांच्या सह्या नोंदवून त्यात कोणतेही ठराव पास करून घेता येईल काय ? तर याचे उत्तर नाही असेच आहे. Card Club house

कारण महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही कायद्याने श्रीनिवास गुर्रम यांना कार्ड क्लब चालविण्याची परवानगी ( लायसन्स) दिलेली असेल तरी देखील श्रीनिवास गुर्रम यांना कार्ड क्लब सुरू करण्यासाठी परवानगी देणे हे पेसा नियमाला धरून नाही. जर हेच कार्ड क्लब( पत्ते खेळण्याचा क्लब) पेसा गावा व्यतिरिक्त दुसऱ्या नॉन पेसा गावात सुद्धा नागरिकांनी अश्या धंद्यांना परवानगी देणे मान्य नसते . Grampanchayat Non pesa


परंतु अंतरगाव(अन्नूर) हे गाव पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे नियमानुसार अशी कोणतीही विषय वस्तू जी अनुसूचित क्षेत्राच्या अधिकार कक्षेत येते आणि ती जर अनुसूचित जमातीच्या रूढी, प्रथा, परंपरा यांच्याशी सुसंगत नसेल तर ती देता येत नाही. antargaon

ग्रामसभेला ती परवानगी देने हा विषय आदिवासी समाजाच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीशी निगळीत नसून पत्ते खेळणे हा विषय आदिवासी समाजाच्या कोणत्याच परंपरेत बसत नाही. त्यामुळे १०० लोकांच्या ऐवजी २०० लोकांनी जरी ग्रामसभेला उपस्थित राहून सह्या केल्या तरी देखील ग्रामसभा श्रीनिवास गुर्रम यांना कार्ड क्लब सुरू करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. जर या मागणीला शासन परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी दिली आहे. Gramsabha


Anne Heche | Kim Kardashian | Premier League | The Sandman
Diego Bertie | Thirteen Lives | What is monkeypox | Tiger Woods
Conor McGregor | Ezra Miller

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.