६ म्हशी ४ गाई व १ वासरू
अंदाजे ७ लाखाचे नुकसान
*घटना स्थळी काँग्रेस ज्येष्ठ नेते नाना गावंडे याची भेट
Nagpur Maharashtra India
बाजारगाव :- आज सकाळी 11 चे सुमारास बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिल यांच्या पडीत शेतात जनावरांना चराई करण्यासाठी नेले असता जनावरांच्या अंगावर जिवंत विद्युत तार पडून 11 जनावरांचा यात ६ म्हशी ४गाई व १ वासरू याचा जागीच मृत्यू झाला तर २ जनावर गंभीर जखमी आहे.
सविस्तर वृत्त असे की आज सकाळी अकराच्या सुमारास बाजारगाव येथील खेमाजी सोंनबाजी धारोकर (६५) हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिल च्या पाठीमागे पडीत असलेले शेतात नेत होते परंतु आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे 220 केबीच्या विद्युत तारावर पडले त्यामुळे विद्युत खांबे सोबत जिवंत तार जमिनीवर तुटून पडले व लगतच चरत असलेले अकरा जनावरे यात सहा म्हशी चार गाई व एक वासरू हे जागीच मरण पावले तर दोन जनावर हे अजूनही गंभीर जखमी आहे सर्व जनावर दुभते (दूध देणारे) असून आज हे माझी संभाजी धारोकर वय 65 यांच्यावर कठीण प्रसंग उडवला आहे घटनेची माहिती लगेच बाजारगाव विद्युत विभागाला देण्यात आली.
त्यांनी लगेच विद्युत प्रवाह बंद करून घटनास्थळ गाठले तसेच कोंढाळी पोलीसंना सुद्धा कळविण्यात आले. घटनेची माहिती नाना गावंडे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष )यांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठले व लगेच पोलीस विद्युत विभाग महसूल विभाग पशू वैद्यकीय अधिकारी यांना लवकरात लवकर पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली नाना गावंडे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष) या वेळी अनिल पाटील, मंगेश चोखांद्रे, तुषार चौधरी (सरपंच बाजारगाव) प्रकाश भोले (उपसरपच) मंगेश भड,विजय चौधरी(सरपंच सातनवरी),संजय भोगे,विनोद लंगोट ,निखिल पाटील ,वसंत बघेले,बबलू भेद्रे,कमलेश यादव यांनी केली