। राज्यात सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन होणार ।
विशेषत: कोरोना व्हायरस साथीच्या आजारानंतर अनेकांनी आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइनला प्राधान्य दिले. तेव्हापासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. हि गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार सायबर इंटेलिजन्स युनिट (cyber intelligence unit) स्थापन करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
Cyber intelligence unit ।
“आम्ही वेबसाइट्स आणि सोशल मीडियाचा मागोवा घेतो, परंतु सायबर इंटेलिजन्स युनिट महत्त्वाचे आहे. कारण ऑनलाइन फसवणूक वाढत आहे. सरकार government सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करेल, असे आश्वासन ते फडणवीस म्हणाले, अनेक वेळा सायबर फसवणूक करणारे वेगवेगळ्या राज्यातून आणि देशांतून काम करतात. त्यांनी चिनी लोन अॅप्सचे ( Chinese loan apps) उदाहरण आहे. त्यापैकी काही नेपाळमधून ऑपरेट केले जातात. "या चिनी लोन अॅप्सची अनेक कॉल सेंटर्स नेपाळमधून चालतात. राज्य पोलिसांनी नेपाळच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे," असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, राज्य सायबर युनिटने 'सायबर वॉच' 'Cyber Watch' मॉड्यूल तयार केले असून, अशा गुन्हेगारीचा मागोवा घेतला जाईल आणि कारवाई केली जाईल.
online-frauds-rise-maha-govt-plans-to-set-up-cyber-intelligence-unit