चंद्रपूर : chandrapur Landslide News | शुक्रवारी पोळ्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू असताना चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरातील आमराई वार्डात धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील घुग्घूस येथील अमराई वार्डातील गजानन मडावी यांचे घर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सुमारे शंभर फुट खोल जमिनीत गाडल्या गेल्यानंतर पुन्हा रात्रीच्या सुमारास चार घरांना तडे गेले आहेत. काल रात्री 13 व आज सकाळी 43 कुटूंबे असे 56 कुटूंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच शंभर मिटरच्या परिसरातील सर्व घरे खाली करण्यात येणार आहे.
4 houses again cracked in that colony of Vekoli; 56 families moved to a safe place!
chandrapur Landslide News |
chandrapur Landslide News |
गजानन मडावी यांचे घर सर्वप्रथम हलायला लागले. मडावी कुटूंबिय घाबरल्याने ते घराबाहेर पडले. आणि क्षणात मातीचे अख्खे घर सुमारे शंभर फुट जमिनीत गाडल्या गेले. या घटनेने आमराई वार्डात नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. प्रशासनाने भविष्यातील धोका लक्षात घेता रात्रीच 13 कुटूंबियांना अन्य ठिकाणी हलविले. तसेच काही कुटूंबियांना सुरक्षिततेकरीता अन्य ठिकाण आश्रय घेण्याच्या सुचना दिल्या. आज सकाळी दिवसभर 43 कुटूंबियांना स्थलांतरीत केले आहे. आतापर्यंत तब्बल 56 कुटूंबियांना हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या सर्व कुटूंबियांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. मडावी यांचे घर जमिनीत गाडल्या गेल्यांनतर पुन्हा रात्रीच्या सुमारास चार घरांना भेगा गेल्या आहेत. मडावी यांचे घर जमिनीत गाडल्या गेल्याने चारही कुटूंबियांनी रात्रीच घर खाली केले होते. आज सकाळी घरांचे निरीक्षण केल्यानंतर चार घरांन भेगा आढळून आल्यात. त्यामुळेच घटनास्थळापासून शंभर मिटर परिसरातील सर्व घरे खाली करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Chandrapur Breaking News|
तहसीलदार निलेश गौड यांनी, आज सकाळी आमराई वार्डातील या घटनेची संपूर्ण पहाणी करून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा परिसर सिल करण्यात आलेला आहे. काल रात्री पासून महसूल, वेकोली व पोलिस प्रशासन तळ ठोकून असून घटनेची पूर्नरावृत्ती होवू नये याकरिता काळजी घेतल्या जात आहे. घटनेची पहाणी केल्यांनतर तहसीलदारांनी वेकोली प्रशासनासोबत बैठक घेऊन या घटनेचे मुळ कारण शोधणार असल्याचे सांगितले. chandrapur Landslide News |
Chandrapur Breaking News|