Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १८, २०२२

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन कार्यालयावर मोर्चा School nutrition employees march to the office with various demands

चंद्रपूर -  आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने दि . १८ जुलै २०२२ रोजी जिल्हा परिषद येथे मोर्चा काढण्यात आला. 


राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त १००० रू. मानधन मिळते. या अत्यंत कमी मानधनामध्ये या कर्मचाऱ्यांकडून पोषण आहार तयार करण्याबरोबरच शाळा उघडणे, शाळेची देखभाल करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुण्यापासून ते अनेक वेळेला स्वच्छालय साफ करावे लागते. मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी  कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. 



स्वयंपाकी महिलांना मात्र ५०० रू . वाढ करून त्यांची थट्टा केली आहे . तसेच मागील तिन महिन्यांपासून या कर्मन्यांना मानधन व इंधन बिलही मिळाले नाही . त्यामुळे पोषण आहार तयार करणाऱ्यांना स्वतः मात्र उपासमारीमध्ये जगावे लागत आहे . महाराष्ट्रामध्ये वरील परिस्थीती असून शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पांडेचेरी राज्यात १४००० / - रू . , केरळ मध्ये १०००० / -रू , तामिळनाडु मध्ये ७७०० / -रू . इतके मानधन मिळते . महाराष्ट्रामध्ये मात्र १००० रू . मानधन देऊन महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्यांची थट्टा केली आहे.


School nutrition employees march to the office with various demands


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.