Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २५, २०२२

सावलीच्या मुख्याधिकारीविरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

सावलीच्या मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार 


न्यायप्रविष्ठ प्रकरणात नंदकिशोर निकुरे यांना बेकायदेशीर नोटीस 


जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार 


सावली । नझूल च्या जागेवर कुठलेही बांधकाम हे  तहसीलदार यांच्याकडे  वैध की अवैध या संदर्भात कारवाई करिता असते. त्या संदर्भात अतिक्रमण नियमित करण्याचा अधिकार हा सुद्धा तहसीलदार यांच्याकडेच असतो. पण, सावली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवला.  सावली दिवाणी न्यायालयात प्रकरण सुरु असताना बांधकाम तोडण्याची नोटीस देऊन एकप्रकारे न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप व अडथळा निर्माण केला असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी केला आहे. 

न्यायप्रविष्ठ प्रकरणात नंदकिशोर निकुरे यांना बेकायदेशीर नोटीस देण्यात आली असून, जिल्हाधिकारी याच्याकडे निवेदन देऊन मुख्याधिकारी याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.


सावली येथील सर्व्हे क्रमांक 131 मधील जवळपास 1965 चौरस मिटर जागा ही नंदकिशोर निकुरे यांची असून त्याच्या शेजारी असणाऱ्या नझुल च्या जागेवर त्यांचे अंदाजे 30 वर्षापूर्वी अतिक्रमण होते. ती जागा सुद्धा नंदकिशोर निकुरे यांच्या सर्व्हे क्रमांक 131 मधीलच असल्याने त्यांनी त्या जागेवर बांधकाम सुरु केले.  महत्वाची बाब म्हणजे ही जागा नझुल ची आहे त्यामुळे या प्रकरणात जर नंदकिशोर निकुरे यांनी अतिक्रमण केले असेल तर याबद्दल तहसील व नझुल प्रशासन ठरवेल की ही जागा नेमकी किती आहे व त्यात अतिक्रमन झाले की नाही.  पण सावली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यानी मनमानी करून सदर जागेवर अवैध बांधकाम असल्याचे ठरवले.  नंदकिशोर निकुरे यांना नोटीस देऊन अतिक्रमण व अवैध बांधकाम तोडण्याचे फर्मान काढले आहे. 


या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सावली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेच्या वतीने देण्यात आले आहे .

https://www.khabarbat.in/2022/07/saoli-chandrapur-nagarpanchayat.html

#Saoli #Chandrapur #Nagarpanchayat



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.