Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै १३, २०२२

गुरुपाेर्णिमानिमित्त साई बाबा मंदिर, विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी गर्दी




गुरुपौर्णिमा अर्थातच आपल्या गुरुंना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक शिष्य या दिवसाची वाट पाहत असते. वर्षभर गुरुंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्याच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चंद्रपुरातील साई बाबा मंदिर येथे भाविकांनी एकच गर्दी केली. Chandrapur Sai baba Mandir


गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला होता. यावर्षी साई बाबा मंदिर भक्तांसाठी खुले असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली. आलेल्या भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची पूजा करण्यात आली. साई बाबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश जगभरात नेण्याचा संकल्प यावेळी अनेक भक्तांनी केल्याचं सांगितलं.



याशिवाय गुरुपाेर्णिमा निमित्त विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी शहरातील भाविक तसेच नागरिक माेठ्या संख्येने आले आहेत. यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची गर्दी झाली असून, भक्तिमय वातावरण होते. Chandrapur Vithtal Mandir

आज गुरुपौर्णिमा निमित्त विठ्लाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. आपली इच्छा प्रकट करतात. विठुरायाला आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेणयासाठी भाविक येत असतात. आजही येथे माेठ्या संख्येने भाविक आले आहेत. रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भर पावसात भाविकांनी मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी रांग लावली आहे. आज सकाळी आरती झाल्यानंतर उत्साहाचे वातारवण आहे. मंदिराला फुलांची आरास आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसंच संस्थानकडून भक्तांच्या सुविधेसाठी व्यवस्था,  प्रसाद, सुरक्षेच्या काळजीसह दर्शनासाठी उत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


पेज नेव्हिगेशन



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.