Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १५, २०२२

माजी पालकमंत्री आ. वडेट्टीवार कडून पूरग्रस्त भागाची पाहणी Irai River, Datala, Rahmatnagar, Naginabagh, Pathanpura Ward, Vitthal Mandir Ward, Dadmahal, Joddeul Ward in Chandrapur City, Flood affected


सरकार कडे करणार नुकसान भरपाईची मागणी


गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे  सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा  आ. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर शहरातील इराई नदी, दाताळा,रहमतनगर , नगिनाबाग, पठाणपुरा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, दादमहल, जोडदेऊळ वार्ड, पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देत नुकसान भरपाईची मागणी सरकार कडे करणार असे आश्वासन देवून नागरिकांचे अश्रू पुसले. तसेच शहरातील सर्व काँग्रेसचे सेल चे पदाधिकारी अतिशय तातडीने मदत कार्य पूर्वत असून काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे अशी ग्वाही राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिली. यावेळी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,  शहराध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष , युवक काँग्रेस पदाधिकारी तथा सर्व सेल पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



Irai River, Datala, Rahmatnagar, Naginabagh, Pathanpura Ward, Vitthal Mandir Ward, Dadmahal, Joddeul Ward in Chandrapur City, Flood affected


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.