चंद्रपूर | येथे आज दि. २४ जुलै धनोजे कुणबी समाज मंडळ चंद्रपूरद्वारे आयोजित गुणवंत गौरव व सत्कार सोहळा संपन्न झाला.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सोबतच कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा देणारे डॉक्टर #कोरोना_योद्धा म्हणून डॉ. सचिन धगडी, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. विनोद मुसळे, डॉ. आशीष पोडे, डॉ. अमीत ढवस यांचा सत्कार तर ब्रिटिश सरकारची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवणारे देशातील पहिले तरुण वकील ॲड. दीपक चटप, आचार्य पदवी प्राप्त प्रा. डॉ. प्रविण भास्कर चटप, मिस डी.सी. इंडिया पुरस्कार प्राप्त कु. गायत्री सूर्यभान उरकुडे तसेच समाजासाठी प्रचार प्रसाराचे उत्कृष्ठ कार्य करणारे श्री हितेश गोहोकार (सकाळ) व साईनाथ कुचनकर (लोकमत) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या समोरील शिक्षणासाठी त्यांना लाभ व्हावा, यासाठी घडलेल्या मान्यवरांच्या अनुभवाचे बोल, त्यांना विविध विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा #यशाची_गुरुकिल्ली करिअर मार्गदर्शक पुरवणीचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. याचे श्रेय हितेश गोहोकार (पुरवणी संयोजक) यांना जाते.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, सोबतच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. अशोक जीवतोडे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विशाल भेदुरकर, प्रमुख अतिथी म्हणून मा सुधाकर अडबाले, मा राजू धांडे, मा मनोहरजी पाऊणकर, डॉ सुरेश जी महाकुलकर इंजि. दिलिप झाडे, पांडुरंग जी टोंगे, तर गुणवंत गौरव सोहळा समिती प्रमुख महेश खंगार, नामदेव मोरे, अण्णाजी जोगी, सविता कोट्टि, गणपत हींगाने, अनिल डहाके, वासुदेव बोबडे, वसंत वडस्कर, सतिश मालेकर, विजय मुसळे, भाऊरावजी नीखाडे, लक्ष्मीकांत धानोरकर, संतोष देरकर आणि समाज मंडळातील पदाधिकारी श्री, सचिव अतुल देऊळकर, विनोद पिंपळशेंडे, अरुण मालेकर, विलास माथणकर, सतीश निब्रड, कौशिक माथणकर सोबतच हॉटेलचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा यशस्वी केला.
Dhanoje Kunbi Samaj Mandal meritorious honor and felicitation ceremony