Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १५, २०२२

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा | Chandrapur Bharatiya Janata Party

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रतिक्रिया



पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे चंद्रपूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्वागत केले आहे.


एका प्रसिद्धी पत्रकात श्री. देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे, असेही श्री. देवराव भोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.   


 केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले असून 'सबका साथ, सबका विकास' हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल असा विश्वास देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला.


Chandrapur Bharatiya Janata Party (BJP) district president Devrao Bhongale has welcomed the state government's decision to reduce petrol and diesel prices by Rs 5 and Rs 3, respectively, by reducing VAT on petrol and diesel.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.