Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ३०, २०२२

विज पडून चार महिलांचा जागीच मृत्यू ; वायगाव परिसरात शोककळा

शिरीष उगे  (वरोरा प्रतिनिधी) 
: स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या वायगाव (भोयर) येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर वीज पडून मरण पावल्याची दुःखद घटना घडली.

आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोरदार मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट सुरू झाला. यात शेतात काम करीत असताना अचानक वातावरण बदलल्याने घराकडे निघालेल्या महिलांवर विज पडली. यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिला हिरावती शालिक झाडे वय ४५ रा. वायगाव (भोयर), माजी पंचायत समिती वरोरा सदस्य पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष राहणार वायगाव, मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष राहणार वायगाव, रीना नामदेव गजभे वय वर्ष २० राहणार वायगाव भोयर. अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला, दोन मुलींचा समावेश आहे. गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी केली आहे. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिली असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा पी एस आय प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे करीत आहे.

our women died after being struck by lightning amid heavy rains at a village in Maharashtra’s Chandrapur district on Saturday, an official said. The incident took place in Wahegaon village of Warora tehsil around 4 pm, sub-divisional officer Subhash Shinde said. The victims were working on a field when it started raining heavily and they took shelter under a tree, he said.

Hiravati Zade (40), Parvata Ramesh Zade (65), Madhumati Zade (20) and Reena Gajabhe (20) were struck by lightning and died on the spot, the official said. Personnel from Warora police station and local officials reached the spot for inspection, he said, adding that the families of the deceased women will be given immediate financial relief.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.