*खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात वणी येथे आंदोलन
शिरीष उगे : (वरोरा प्रतिनिधी)
: सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया, राहुल हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाहीसमोर झुकत नाही असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.
आज वणी येथील आंबेडकर चौकात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, वामनराव आवारी, प्रमोद निकुरे, अशा टोंगे, सविता टिपले, निलेश भालेराव प्रवीण काकडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलणं खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, मोदी सरकार हे विरोधी पक्ष दबावात ठेवण्याकरिता हुकूमशाही सरकार प्रमाणे काम करीत आहे. ईडीला हाताशी धरून विरोधी पक्षातील नेत्यांच्या आवाज दाबण्याचे कपटी राजकारण करीत आहे. परंतु गांधी घराण्याला बलिदानाचा वारसा आहे. गांधी कुटुंब या ईडीच्या कारवाईला भिणारे नसून लढणारे आहे. त्यामुळे मोदी सरकारने हे आपले अपयश लपण्याकरिता ईडीच्या आधार घेत असल्याच्या आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला आहे.