Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २७, २०२२

विद्यार्थ्यांनी रोखली खासदारांची वाट; बाळू धानोरकर झाले अवाक


आदरतिथ्य बघून खासदार भारावले


मागील वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावात हाहाकार मजला आहे. शेती, घरे यांची नुकसान झाले. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांनी बसला. अशातच गावात पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी येणार असल्याची माहिती चिमुकल्या मुलांना कळली. गावात खासदार येताच मुलांनी वाट अडवून धरली. हा प्रकार बघून खासदार बाळू धानोरकर आवाक झालेत. ही चिमुकली मुले आता कोणत्या मागणीसाठी आंदोलन तर करीत नाही ना, असा समज काहीवेळासाठी झाला. मात्र, या चिमुकल्या मुलांनी स्वागत आणि केलेले आदरतिथ्य बघून खासदार बाळू धानोरकर भारावले.



राजकारणातील मोठा नेता येणार म्हटलं की गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. वाजत गाजत सत्कार करतात. मात्र पोंभुरणा तालुक्यातील देवाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खासदारांची वाट अडवून धरत स्वागत केले.


हा अनोखा प्रकार बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चंद्रपूर वनी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी मतदारसंघांमध्ये दौरे करीत आहेत. त्याच अनुषंगाने अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या देवाळा गावाला त्यांनी भेट दिली. नुकसानीची पाहणी करत असतात करण्यासाठी गेले असताना गावातील चिमुकल्यांनी मात्र त्यांची वाट अडवून धरली आणि सप्राईज सत्कार केला.

Balu Dharorkar

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.